ताज्या घडामोडी

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने हिंगोलीची मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन पूर्ववत

रामु चव्हाण

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने हिंगोलीची मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन पूर्ववत ; गरजू रुग्णांना पुन्हा मिळणार आरोग्य सेवा

वसमत/ रामु चव्हाण

   राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प योजनेत हिंगोली जिल्ह्याचा समावेश असून हिंगोली जिल्ह्यातील मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार होती परंतु खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सदरील युनिट व्हॅन हिंगोली जिल्ह्यासाठी पूर्ववत करण्यात आल्यामुळे गरजू रुग्णांना पुन्हा आरोग्य सेवा मिळणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेमधून आनंद व्यक्त केला जात आहे .


राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प योजनेत हिंगोली जिल्ह्याचा यापूर्वी समावेश करण्यात आला होता. या माध्यमातून जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 48 पेक्षा जास्त गावांमध्ये या योजनेची व्हॅन चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा देत होती. त्यामुळे गरजू व अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना या रुग्णसेवेचा मोठा आधार होता. मात्र मध्यंतरी हिंगोली जिल्ह्यातील सुरू असलेली मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन बंद करून, नाशिक येथे स्थलांतरित करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. ही बाब खासदार हेमंत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी सहसंचालक ( तांत्रिक ) आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आवश्यक पाठपुरावा करून, हिंगोली जिल्ह्यातील सुरू असलेली ही आरोग्यसेवा सुरू राहावी, यासाठी प्रयत्न केला. तसेच ही मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन बंद केल्यास हिंगोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या वेळी व इतरही गरजेनुसार मिळणारी आरोग्य सेवा यापासून वंचित राहावे लागले असते . त्यामुळे पूर्वीपासून सुरू असलेली मोबाईल मेडिकल युनिट सेवा जिल्ह्यात पूर्ववत ठेवण्यासंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने मागणी व पाठपुरावा केल्याने, ही सेवा हिंगोली जिल्ह्यात पूर्ववत सुरू राहणार आहे. हि सेवा पूर्ववत केल्यामुळे अतिदुर्गम गावातील गरजू रुग्णांना मोठा फायदाच होणार आहे.

कोट :
हिंगोली जिल्हा मागास भागात येतो. त्यामुळे जिल्ह्यासाठी मोबाईल मेडिकल व्हॅन देण्यात आली होती. या मोबाईल मेडिकल व्हॅनचा जिल्ह्यातील गरजवंत रुग्णांना दिलासा मिळत होता हि आनंदाची गोष्ट आहे ‌ परंतू हि सुरळीत सेवा नाशिककरांसाठी देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यास विरोध करुन जिल्ह्यासाठी असलेली ही मोबाईल मेडिकल व्हॅन सेवा कुठेही हलविण्यात येऊनये यासाठी प्रयत्न केले त्यास यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरजवंत रुग्णांना पुन्हा हि सेवा दिलासा दायक ठरले यात कुठेही शंका नाही.
– खासदार हेमंत पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!