आपला जिल्हामहाराष्ट्र

वसमत तालुक्यात चार विशेष मतदान केंद्र-डाॅ सचिन खल्लाळ

रामु चव्हाण

डाॅ.सचिन खल्लाळ यांनी घेतले अपंग मतदान केंद्राचे पालकत्व

वसमत / रामु चव्हाण

हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज झाले असून यासाठी वसमत तालुक्यात विविध मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी वसमत मतदारसंघांमध्ये चार विशेष मतदान केंद्र कार्यान्वित केले आहे. यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदान केंद्र, महिला मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र ,आदर्श मतदान केंद्र अशा चार विशेष मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग मतदान केंद्राचे पालकत्व डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी घेतले, तर महिला मतदान केंद्राची जबाबदारी तहसीलदार श्रीमती शारदाताई दळवी यांनी घेतली तर युवा मतदान केंद्राची जबाबदारी निलेश सुंकेवार मुख्याधिकारी नगरपरिषद वसमत यांनी घेतले तर आदर्श मतदान केंद्राची जबाबदारी विलास तेलंग नायब तहसीलदार वसमत यांच्याकडे आहे. या आदर्श मतदान केंद्राची जबाबदारी संबंधित अधिकारी यांना देण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकार उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!