आपला जिल्हाक्राईम स्टोरी

वसमत येथील व्यापा-याला 1 कोटीची खंडणी मागणारे 3 आरोपींना अटक

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत शहरातील एका कपड्या व्यापाऱ्याला एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गोळीने ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना वसमत शहर व स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी बाराशे किलोमीटर असलेल्या राजस्थान येथून अटक केली आहे.
शहरातील गजानन बाबा वस्त्र भंडार चे मालक मनोज दत्तात्रय दलाल 38 वर्ष यांनी दिनांक 7 एप्रिल रोजी वसमत शहर पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली की त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून एक कोटी रुपयाची खंडणी ते अन्यथा गोळी मारून तुझा जिव घेऊ असे धमकी दिली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून मा. पोलीस अधीक्षक, म अप्पर पोलीस अधीक्षक ,उप विभागीय अधिकारी वसमत ,स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू ,सपोनि शिवसांब घेवारे, पोउनि विक्रम विठूबोने ,पोलीस कर्मचारी दीपक पाटील दत्तात्रय नागरे ,इरफान पठाण राजू गुठे , प्रभु मोकाडे,डि.जी.मात्रे,शेख बाबर, गजानन पोकळे ,विठ्ठल काळे, गणेश लेकुळे यांच्या पथकाने मोबाईलचे लोकेशन व इतर तांत्रिक बाबींचा तपास करून पोलीस अधीक्षक राजस्थान यांच्या मदतीने सदरील आरोपीत महेबुब खान अब्दुल खान वय 24 वर्ष वेल्डिंग काम रा.मुसलमानका वास,खेर ता.पचपदरा जि.बलोतरा राजस्थान येथुन आरोपीस तिथून ताब्यात घेतले आहे.
दिलेल्या माहितीनुसार गजानन बाबा वस्त्र भांडार येथील एका कर्मचाऱ्यांनी सदरील माहिती ही आरोपी यांना पुरवली असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे या मध्ये गजानन बाबा वस्त्र भांडार येथे
काम करणारा कृष्णा तुकाराम बेंडे वय 19 वर्ष राहणार पळशी व एक ऑटो चालक ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे वय 23 वर्षे रा.पळशी ता.वसमत यानी संगमणत करून हा खंडणीचा बनाव रचण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव मांजरमकर हे पुढील तपास करत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!