आपला जिल्हासामाजिक

बाबुराव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त परिक्षा पॅडचे वाटप तर सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

कुरुंदा येथे विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप
कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे 8 फेब्रुवारी रोजी कीर्तन कार्यक्रम

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा ग्राम पंचायत सदस्य बाबुराव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्चाला फाटा देत एन. एम. कुरेशी उर्दू हायस्कूल , नरहर कुरुंदकर विघालय, केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा , जिल्हा परिषद उर्दू शाळा , व जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा पॅड वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी बाबुराव दळवी , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास मामा भोसले,मुंजाजीराव दळवी पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष गजाननराव डाढाळे , दिलीपराव डाढाळे, दिलीपराव सोनटक्के , गौतम ढेंबरे सरपंच दाभडी, ईश्वर नरवाडे , शेख ताहेर भाई यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
बाबुराव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता दुर्गामाता मंदिराच्या मैदानात होणार आहे कार्यक्रमाचे संयोजक ,बबन धामनीकर,संतोष इंगोले, नारायण आवसरमले,दिलीप सोनटक्के, शेख ताहेरभाई,सलमान खा पठाण,नारायण खरबे,गणपत सिद्धेवार,संजय कंद्यारे यांच्या वतीने कार्यक्रमाला कुरुंदा व परिसरातील ग्रामस्थांनी सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!