आपला जिल्हामहाराष्ट्र

कुरुंदा येथे आज सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम

रामु चव्हाण

वसमत : रामु चव्हाण

   समाजप्रबोधनपर कीर्तनातून जनजागृती करणारे कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे आज भव्य कीर्तन सोहळा कुरुंदा येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा ग्राम पंचायत सदस्य बाबुराव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्चाला फाटा देत एन. एम. कुरेशी उर्दू हायस्कूल , नरहर कुरुंदकर विघालय, केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा , जिल्हा परिषद उर्दू शाळा , व जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी बाबुराव दळवी , राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास मामा भोसले,
मुंजाजीराव दळवी पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष गजाननराव डाढाळे , दिलीपराव डाढाळे, दिलीपराव सोनटक्के , गौतम ढेंबरे सरपंच दाभडी, ईश्वर नरवाडे , शेख ताहेर भाई यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
बाबुराव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन आज सायंकाळी 6 वाजता दुर्गामाता मंदिराच्या मैदानात होणार आहे कार्यक्रमाचे संयोजक ,बबन धामनीकर,संतोष इंगोले, नारायण आवसरमले,दिलीप सोनटक्के, शेख ताहेरभाई,सलमान खा पठाण,नारायण खरबे,गणपत सिद्धेवार,संजय कंद्यारे यांच्या वतीने कार्यक्रमाला कुरुंदा व परिसरातील ग्रामस्थांनी सामाजिक प्रबोधनपर कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!