आपला जिल्हा

लालबहादूर शास्री विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत गणिती रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच प्रतिकृती, तक्ते, गणित विषयाशी निगडित संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गणित विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी भव्य अशा गणित रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण यांनी अध्यक्षस्थान भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री आसाराम दुधाटे, सेमी माध्यमाच्या मुख्यध्यापिका सौ प्रतिभा गोंगे,प्रि प्रायमरी विभागाच्या प्रमुख सौ दुर्गाताई ढेपे तसेच तिन्ही विभागाचे समन्वयक श्री संदीप चाटोरिकर यांची उपस्थिती होती. वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या चरित्राचा आढावा घेतला. कार्यक्रमाला श्री संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. रामानुजन यांनी कशा रितीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणितीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमातील स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून विद्यालयातील सर्व गणित शिक्षक लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिसिर कांता यांनी केले. तर आभार श्री आसाराम दुधाटे यांनी मानले.
गणित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले संस्थेचे अध्यक्ष संदिप चव्हाण सर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!