ताज्या घडामोडी

तेरावा दिवस-श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा

रामु चव्हाण

श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात

तेरावा दिवस

आजच्या सत्रात देवाची कथा श्रवण करताना मनुष्याचे मन कसे प्रसन्न होते यावर निरूपण केले.
मन प्रसन्न कसे होते या विषयावर विवेचन करताना ई श्री दादांनी दिवाळी सणाचे उदाहरण दिले.ते म्हणाले दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो , पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो . इतकेच नव्हे , तर आदल्या दिवसाची परिस्थिती , संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात . याचा अर्थ असा की , परिस्थितीत बदल होत नाही . दिवाळीचा दिवस , हा दिवस या नात्याने निराळा नाही . पण काल आपण जे केले , ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही , हाच मुख्य फरक होय . आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो . हे जर खरे , तर तसा तो आपण नेहमीच का करु नये ? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी ; आपण नेहमीच आनंदात असावे ; आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा . आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी -आनंद करतो . मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे ? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे . तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही . भगवंताचे स्वरुपच मुळी आनंदमय आहे
असे सांगून आजच्या सत्राचा समारोप झाला.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!