आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

रुग्ण सेवा हीच पवित्र सेवा — डॉ क्यातमवार

रामु चव्हाण

रेनबो किड्स बाल रुग्णालयाचे थाटात स्थलांतरण

वसमत / रामु चव्हाण

रुग्णसेवा हीच पवित्र सेवा असून डॉक्टरांनी तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य सेवा करावी असे प्रतिपादन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आर. एम क्यातमवार यांनी रेम्बो किड्स बाल रुग्णालयाच्या स्थलांतरण सोहळ्या प्रसंगी केले.
16 सप्टेंबर शनिवारी रेम्बो किड्स बाल रुग्णालयाचे बँक कॉलोनी. डॉक्टर लाईन. सहारा बिल्डिंग. येथे थाटात स्थलांतरण झाले. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे. शिश्वेश्वर बँक चे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार . माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज. खालील अहमद. माजी नगराध्यक्षा मनीषा कडतन.डॉ तुकाराम चव्हाण.डॉ छाया चव्हाण अडकीणे. वैशाली रावतोळे.एड सिराज आलम. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शेख आयुब आदी मान्यवर उपस्थित होते‌.

यावेळी पुढे बोलताना डॉ क्यातमवार म्हणाले की अगोदर नवजात बाल रुग्णांना उपचारासाठी नांदेडला जावे लागत होते आणि यासाठी त्यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. पण आता वसमतलाच रेम्बो किड्स या बाल रुग्णालयात नवजात शिशूच्या उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध असून डॉ शारेक अहमद यांना मुंबई. दिल्ली .नांदेड सारख्या मोठा रुग्णालयातील रुग्णसेवेचा दांगडा अनुभव असून वसमत वासियांना त्यांचा अनुभवाचा निश्चितच फायदा होईल .यावेळी डॉ महेश रावतोळे. डॉ गंगाप्रसाद बोरीवाले .डॉ दीपक सातपुते .डॉ शकेब अहमद यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक फिरोज पठाण यांनी केले .यावेळी शहरातील डॉक्टर्स. विधीतज्ञ. प्रतिष्ठित व्यापारी आदींनी यावेळी रेम्बो किड्स बाल रुग्णालयाचे संचालक डॉ शारेख अहमद यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!