ताज्या घडामोडी

चिश्तीया महाविद्यालयास नॅक चा B+ दर्जा प्राप्त

रामु चव्हाण

दिनांक 18 व 19 ऑगस्ट 2022 रोजी बंगलूरू येथील नॅक समितीने चिश्तीया महाविद्यालय खुलताबाद ला भेट दिली.या समितीचे चेअरमन डाॅ.सतीशचंद्र गारकोटी ( प्र.कुलगूरू जे.एन.यू. दिल्ली) तर सदस्य डाॅ. पी. नटराजन (केंद्रीय विद्यापीठ पाॅडेचरी),डाॅ. पार्वथी अपय्या (माजी प्राचार्य शासकीय महाविद्यालय मॅगंलोर)हे होते.
महाविद्यालयीन भौतिक सुविधा,महाविद्यालयीन चालू असलेल्या शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थी अनुषंगाने विद्यार्थी बौद्धिक सामाजिक, शैक्षणिक या सर्व अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाठी कश्या पध्दतीने तत्पर असते या परिसरातील पालक व माजी विद्यार्थी यांना कश्याप्रकारे महाविद्यालयाशी नात जोडण्याचा प्रयत्न महाविद्यालय कसा करते या सर्व बाबींचा अभ्यास पूर्ण रित्या व पुराव्यानिशी सदरील समितीने आपला अहवाल नॅक ला सादर केला. महाविद्यालयाने पाठवलेला एस.एस.आर रिपोर्ट व नॅक समितीच्या अहवालाच्या आधारे नॅक मूल्यांकन दर्जा ठरविण्यात आला.तसेच महाविद्यालयाला यापूर्वी 2004 मध्ये C++,2014 मध्ये B तर आत्ता नॅक तर्फे B+ हा दर्जा बहाल करण्यात आला.याचाच अर्थ असा होतो की,महाविद्यालयाचा विकास क्रमाक्रमाने वाढत गेलेला आहे असे नॅक कडून प्रमाणीत केलेला आहे.
महाविद्यालयास B+ दर्जा मिळ्याल्याने शैक्षणिक विकासाचे अनेक द्वारे खुली झाली. परिसरातील विद्यार्थ्यांना नव-नविन व्यवसायाभिमुख कोर्स करता येईल म्हणून तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयास मिळालेल्या दर्जामुळे लाभ होणार आहे.
महाविद्यालयास B+ दर्जा प्राप्त झाल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी,पालक, माजी विद्यार्थी व समाजिक कार्यकर्ते यांच्याकडून महाविद्यालयास अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यासाठी संस्था अध्यक्ष मोहम्मद आयुब साहेब, महासचिव अब्दुल वहिद साहेब, कोषाध्यक्ष अब्दुल मुकीत साहेब, प्राचार्य डाॅ.एजाज शेख, आय. क्यू .एसी. संचालिका डाॅ.सय्यदा अर्शिया,प्रा.शैलेंद्र भणगे,डाॅ.पुरुषोत्तम रामटेके,डाॅ.अफसर शेख, प्रा.सुनील जाधव, डाॅ.खान हमीदा,डाॅ.शिल्पा देशपांडे,डाॅ.सिद्दीकी अफरोजा, रहेमत खान , अथर अली, डाॅ. नाझनीन सुलताना , डाॅ.शेख नुरजहाॅ, शहा हाशम, मोहम्मद रियाजोद्दीन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!