आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना महिला आघाडीच्या वसमत तालुका प्रमुखपदी डाॅ.सौ.प्रितीताई प्रभाकर दळवी

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

 कुरूंदा  ग्रामपंचायत च्या माजी सरपंच डॉ.सौ.प्रितीताई प्रभाकर दळवी यांची आज शिवसेना महिला आघाडीच्या वसमत तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली

 

माजी सरपंच डॉ.सौ.प्रितीताई प्रभाकर दळवी यांच्या सरपंचपदाचा आठ महिन्याचा काळात ग्रामपंचायत मध्ये बसून जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील निर्मल ग्राम पंचायतीचे लोकप्रिय सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे अनुभव समजून घेऊन विकास कामाबरोबरच सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती व वृक्ष संगोपन याकडे लक्ष देण्याचे निर्धारित केले, मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाच्या कार्यक्रमांमध्ये महिला सबलीकरणाच्या दृष्टीने भव्य अशा महिला मेळाव्याचे आयोजन केले तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक स्वच्छता सप्ताह साजरा केला. यामध्ये विविध शाळांना समाविष्ट करून शाळकरी मुलांना कॅरीबॅग मुक्त गाव , हागणदारी मुक्त गाव ,व एक कुटुंब एक झाड या संकल्पना शाळकरी मुलाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला.

फुलारी मंदिर परिसर व सह्याद्री देवराई मातृतीर्थ टोकाईगड परिसर येथे वृक्षलागवड चळवळ सुरू करण्यासाठी सहकार्य केले तसेच टोकाईगड येथे मोजणी करून गडाच्या सीमा निश्चित करा म्हणून उपविभागीय कार्यालय वसमत व जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली तसेच कुरुंदवासियांच्या जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे कुरुंदा येथील राशन दुकाने मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली व तहसीलदार वसमत यांच्याकडे सतत फोनवर वा समक्ष भेटून पाठपुरावा सुरू केला.

कोरोना या जागतिक महामारी संकटसमयी आपल्याला आपल्या गावाची व गावातील जनतेची सेवा एक डाॅक्टर व सरपंच करण्याचं भाग्य मला लाभलं याबद्दल आम्ही ईस्वराचे आभार मानतो, या संकट समयी बाहेरून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण, जनतेमध्ये कोरोणाविषयी जनजागरण करणे, जिल्हास्तरावरन आलेल्या प्रशासकीय आदेशाचे पालन योग्य रीतीने कर्मचाऱ्यांकडून करून घेणे. स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याच्या परीने कोरोना ही महामारी गावापासून दूर कशी राहील यासाठी  सर्व सहकारी, ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्ते यांना सोबत घेउन ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण गावामध्ये आशासेविकेच्या माध्यमातून हँडसानिटीझर व डेटॉल साबण यांचे तर स्वखर्चातून पूर्ण गावात घरोघरी जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधीचे मोफत वाटप केले.

या सह अनेक कामांची दखल आज शिवसेना पक्षाने घेऊन आज त्यांना शिवसेना महिला आघाडीच्या वसमत तालुका प्रमुख पदी निवड केली.यावेळेस खा.संजय मंडलिक,संपर्क प्रमुख आनंदराव जाधव,जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर,उपजिल्हाप्रमुख सुनिल भाऊ काळे,तालुकाप्रमुख राजु चापके,अंकुश आहेर,बालाजीराव तांबोळी,श्रीनिवास पोराजवार,राम कदम,कन्हैया बाहेती, राजेश इंगोले,रविंद्र नादरे ,रेखाताई देवकते,काशीनाथ भोसले,धनंजय गोरे, रमेश दळवी,दत्तराव इंगोले, डाॅ प्रभाकर दळवी,प्रभाकर क्षीरसागर,दत्तराव भालेराव सह शिवसेना ,युवासेना,महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!