आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वसमतला खगोल प्रेमींनी लुटला सूर्यग्रहणाचा आनंद

रामु चव्हाण

लिट्ल किंग्ज शाळेने उपलब्ध केले सौर चष्मे

वसमत \ रामु चव्हाण

हिंगोली ऍस्ट्रॉनॉमिक सोसायटी आणि लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल वसमत आणि शिक्षण विभाग पंचायत समिती वसमत . यांच्या विद्यमाने वसमत येथे शाळेच्या मैदानावर ता २५ ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता खंडग्रास सूर्यग्रहणाच्या निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक पालक खगोल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्यग्रहण सायंकाळी चार वाजून 52 मिनिटांनी सुरू झाले. आणि सूर्यास्त होईपर्यंत सूर्यग्रहण पाहण्याचा पाचशे विद्यार्थ्यांनी आनंद लुटला .
या सूर्यग्रहणाबद्दल शास्त्रीय माहिती लिटल किंग इंग्लिश स्कूलचे विज्ञान विषयक शिक्षक श्रवण कदम सर यांनी विद्यार्थ्यांना दिली .
सूर्यग्रहणाबद्दल असलेला गैरसमज अंधश्रद्धा याबद्दलही त्यांनी सखोल मार्गदर्शन उपस्थित नागरिकांना केले.
यावेळी खगोल प्रेमींनी सूर्यग्रहणाच्या बाबतीत त्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे कदम सर यांच्याकडून समजून घेतली .
हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी वसमत येथील एक प्रयोगशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली लिटल किंग्स इंग्लिश स्कूल या शाळेने खगोल प्रेमी उपस्थित शिक्षक विद्यार्थी यांना सौर चष्मे उपलब्ध करून दिली होती.
यावेळी वसमत पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले रोहिदास मगर, वसंतराव मगर , तसेच वसमत शहरातील विविध शाळांची शिक्षक आणि पाचशेच्या वर विद्यार्थी यांनी या सूर्यग्रहणाचा आनंद लुटला.

आमावसेच्या दिवशी जेव्हां सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात आणि पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते चंद्रबिंबाची सावली जेव्हा सूर्याला अंशाचा झाकते तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण घडवून येत असते.
ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे या काळात कोणतेही धोकेदायक किरणे निर्माण होत नाहीत त्यामुळे वातावरणात किंवा सजीवांच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही साहजिकच ग्रहण काळाचा आणि अन्न पाणी दूषित होण्याचा तसेच शुभ अशुभ किंवा वाईट घटना घडण्याचा काही संबंध नाही.- प्रा डॉ नामदेव दळवी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!