आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

राज्यस्तरीय आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेत लीटल किंग्ज शाळा तृतीय .

रामु चव्हाण

महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई चा उपक्रम .

वसमत / रामु चव्हाण

महाराष्ट्र राज्य बालभवन मुंबईच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित इयत्ता पाचवी ते नववी तील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय समूह नृत्यस्पर्धेत चे आयोजन करण्यात आले होते .
महाराष्ट्रातून फेब्रुवारी २०२२ मध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरूवातीला सादरीकरण करण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्रातूनच दीडशे शाळांनी सहभाग घेतला होता . त्यापैकी राज्यभरातून निवडक दहा शाळेची निवड राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली होती .
या दहा शाळांची स्पर्धा मंत्रालया जवळील मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्या रंगस्वर सभागृहामध्ये दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी स्पर्धा सादर करण्यात आल्या . महाराष्ट्रातून नाशिक, मालेगाव ,मुंबई ,चेंबूर घाटकोपर, मालाड, आणि हिंगोली येथील निवडक दहा शाळा या स्पर्धेत प्रत्यक्ष ऑफलाईन सहभागी झाल्या होत्या .
वसमत येथील लिटल किंग्स इंग्लिश स्कूलच्या वतीने लोकनृत्य स्पर्धा प्रकारात हलगी यावर लोकनृत्य सादरीकरण करून राज्यभरातून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड , शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू , शिक्षण सचिव प्रवीण मुंडे , महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई चे संचालक आर.एस .नाईकवाडी यांच्या शुभहस्ते शाळेच्या संघातील मुलींना मेडल ,प्रमाणपत्र व मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या संघाला शाळेतील सांस्कृतिक विभागाच्या वतीने संजय उबारे सर, सइम पिराजी , जसवंती देशमाने मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते.
लीटल किंग्ज शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी मधील नंदिनी करवंदे, स्वरूपा नादरे, अक्षरा रणखांब , प्राजक्ता दळवी, वैष्णवी भिसे ,जुही मेहता , आरती नाईक , वैष्णवी वाहुळकर , हर्षदा मुरक्या ,राजलक्ष्मी जायभाये या मुलींनी समूहनृत्त्यात सहभाग घेतला होता . यशस्वी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे वसमत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, केंद्रप्रमुख वराड सर, शाळेचे मु अ. गोविंद दळवी, संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी यांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!