आपला जिल्हामहाराष्ट्र

संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणार- साईनाथ महाराज वसमतकर

रामु चव्हाण

यापुढे प्रथम स्वच्छता अभियान व नंतर कीर्तनाचा कार्यक्रम साईनाथ महाराज

वसमत/ रामु चव्हाण

वसमत शहरात साईनाथ महाराज वसमतकर यांनी रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त वसमत येथून स्वच्छता अभियानास सुरुवात केली .
वसमत येथील साईनाथ महाराज यांचे माहूर येथे विविध धार्मिक कार्यक्रम नेहमी असतात त्याचबरोबर कीर्तनाचा कार्यक्रम नित्यनियमाने होत असतो .वसमत येेथे श्री दत्तगुरु याांचे प्रथम वसमत येथे नामस्मरणास सुरुवात झाल्यानंतर त््यास आज 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच वसमत शहरामध्ये संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियानास सुरुवात केली.

  यामध्ये या अभियानाची सुरुवात राष्ट्रगीताने करणारे एकमेव साईनाथ महाराज असल्याचे वसमत वासी यांनी बोलून दाखवले यावेळेस वसमत शहरातील गवळी मारुती मंदिर येथून स्वच्छता अभियानास सुरुवात झाली यात उपजिल्हा रुग्णालयातील पूर्ण रुग्णालयाची स्वच्छता साईनाथ महाराज यांच्यासह महिला-पुरुष भाविक भक्तांनी केली त्याचबरोबर सत्याग्रह चौक झेंडा चौक , सत्यनारायण टाॅकीज ते दत्त मंदिर असा  संपूर्ण परिसर  स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्यात आला.


गुरुवर्य साईनाथ महाराज यांचे धार्मिक कार्यक्रमाबरोबरच व राष्ट्रीय कार्यक्रमाला सुध्दा हातभार लावत… आपण यापुढे सप्त सूत्री कार्यक्रमाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवणार असल्याचं साईनाथ महाराज यांनी सांगितले .तर आपणास परवानगी मिळाली तर भारत-पाकिस्तान सीमेवर सुद्धा नामस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करून जगाला शांततेचा संदेश देण्याचा मानस असल्याचे साईनाथ महाराज वसमतकर यांनी बोलून दाखवले यावेळेस श्री दत्त मंदिर येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यायात आला होता यावेळी हजारो भाविक भक्तत उपस्थित होते.

तसेच यावेळी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ काळे शहर प्रमुख काशिनाथ भोसले उपशहर प्रमुख प्रभाकर शिरसागर , राजु बोखारे, रमेश तमखाने राजेश क्षीरसागर ,सोमनाथ हेगू,  कुंडलिक शिरसागर कान्हा चव्हाण, जगदीश चव्हाण,दिनेश कदम, विष्णू चव्हाण,गुलाब चव्हाण यांच्यासह भक्त उपस्थित होते

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!