आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीय

खा. हेमंतभाऊ पाटील आपल्या वेतनातून काढणार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगाचा विमा..!

रामु चव्हाण

दिव्यांग दिन दुबळ्यांची सेवा ही बाळासाहेबांच्या संस्काराची देणगी – विश्वनाथ नेरुरकर

वसमत/ रामु चव्हाण

 

समाजातील दिन दुबळ्या ,दिव्यांग, शोषित , पीडितांसाठी संवेदना असलेलं मन ठेवून काम करण्याचे संस्कार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून आलेली देणगी आहे, बाळासाहेबांनी दिलेल्या समाजकारणाच्या शिकवणुकीतून हे कार्य घडते आणि खासदार हेमंत पाटील यांनी आज दिव्यांग साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवून ते सिद्ध केले आहे. असे गौरोउद्गार शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख,जेष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी काढले. ते वसमत येथे झालेल्या दिव्यांग साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर हिंगोली, नांदेड बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आंनद जाधव, खासदार हेमंत पाटील ,माजी खा.शिवाजी माने,आ.संतोष बांगर, आ.बालाजी कल्याणकर, समाज कल्याण सहायक उपायुक्त शिवानंद मिनगिरे,यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
*यावेळी खासदार हेमंत पाटील बोलताना म्हणाले की,दिव्यांग बांधवांचा विमा काढण्यासाठी मी माझा खासदरकीचे वेतन देत असून यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांगाचा विमा काढून घेण्याची जबाबदारी समाजकल्याण विभागावर सोपवत आहे.सोबतच आपणा सर्वांची ही सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे की दिव्यांग बांधवांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे,मला सांगताना आनंद होतो की, देशातील पहिले दिव्यांग पूणर्वसन केंद्र हिंगोली मध्ये होत आहे यापुढेही दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर असेन.*
कार्यक्रमाला वसमत तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख सुनील काळे,विधानसभा संघटक संभाजी बेले, तालुका प्रमुख राजू चापके, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार,तालुका प्रमुख अंकुश आहेर, माजी तालुका प्रमुख बालाजी तांबोळी,उपतालुका प्रमुख विलास नरवाडे, जि. प.सदस्य श्रीशैल्य स्वामी,प्रल्हाद राखोंडे, युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती,युवासेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर तांबोळी,शहर प्रमुख काशीनाथ भोसले,शेतकरी संघटनेचे प्रल्हाद इंगोले,जेष्ठ शिवसैनिक विश्वनाथ दळवी,दत्ताराम इंगोले,माजी शिक्षण सभापती रंगराव कदम,शिवसेना वसमत तालुका प्रसिद्धी प्रमुख शिवराज यशवंते, उपशहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, व्यंकटेश कऱ्हाळे, उपसभापती विजय नरवाडे,भद्रीनाथ कदम,नवनाथ खराटे,नवनाथ चव्हाण गोविंद सावंत,सौरभ शिंदे, खासदार हेमंत पाटील यांचे वसमत जनसंपर्क अधिकारी चक्रधर खराटे,यांच्यासह आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र सरकारच्या एल्मिको उपक्रमाचे कमलेशकुमार यादव, सृजन भालेराव, शिवाजी गावंडे,डॉ.अनिल देवसरकर, विलास वाकडीकर, विष्णू वैरागड,हिंगोली समाज कल्याण आणि वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सहायक गटविकास अधिकारी आणि निवासी मूकबधिर विद्यालय खांडेगाव येथील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!