ताज्या घडामोडी

बारावा दिवस – श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा

रामु चव्हाण

श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात

बारावा दिवस

प्रवाचक आदरणीय श्रध्येय पू ई श्री सैंगराजदादा बिडकर (सातारा)यांच्या सुमधुर वाणीतून मराठी आद्यग्रंथ पंडित माहीमभट्ट संकलीत लीळाचरित्र या ग्रंथातील बेलोपुर चरित्र या विषयाला अनुसरून परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या अमृतश्रवणीय लीळा निरूपण सोहळा कुरुंदा येथे सुरू आहे. बहुसंख्येने भक्त-भाविक या सोहळ्याचा लाभ घेत आहे,आजच्या या सत्संगात *विषय* या बिंदुवर निरूपण झाले, त्यांनी सांगितले देहाला सांभाळणे जरुर आहे; परंतु भगवंतप्राप्तीकरिता ते करावे, विषयाकरिता नाही. बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालविले, यात काय मिळविले? हा वेडेपणाच म्हणायचा. आतल्या खोबर्‍याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही. विषयात मनुष्य कशाप्रकारे आसक्त आहे हे आज भाविकांना सांगितलेसाधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो, आणि विषयात तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सूख होतेसे वाटते. पण वास्तविक, आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी असे सांगून भगवंताचे नामस्मरण करावे असे सांगितले. व श्रीकृष्ण भगवंताच्या नामाचा जयघोष करून आजचे सत्र संपन्न झाले.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!