आपला जिल्हाराजकीय

टेंभुर्णी येथे जलजिवन मिशन अंतर्गत 1 कोटी 10 लाख रूच्या विकास कामांचा आ.राजुभैय्या नवघरे यांचाहस्ते शुभारंभ

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे जल जीवन मिशन अंतर्गत आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पार पडला.

 

   टेंभुर्णी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी म्हणून टेंभुर्णी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक विहिरीचे भूमिपूजन सोहळा वसमत विधानसभा मतदारसंघाच लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमदार राजू भैया नवघरे यांनी नागरिकांशी संवाद साधला गावातील रस्त्याची दैनिय अवस्था झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितली तसेच टेंभुर्णी हे सर्कलचे मोठे गाव असून या गावामध्ये ग्रामपंचायत साठी कार्यालय नाही असे गावकऱ्यांनी प्रश्न मांडले त्यास आमदार यांनी सकारात्मक उत्तर देत यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल  व सार्वजनिक विहिरीचे बांधकाम व पाईपलाईन साठी एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे आणि विहिरीचे काम दर्जेदार स्वरूपाचे  करण्याच्या सुचना आमदार राजू भैया यांनी  सांगितले विहिरी साठी दानशूर माजी पोलीस पाटील रामराव सवंडकर यांनी आपल्या शेतातील जागा  मोफत दान केलेली आहे. तरी त्यामुळे त्यांचे गावातील नागरिक  व आमदार यांनी कौतुक केले .यावेळी
सभापती तानाजी बेेंडे, उपसभापती सचिन भोसले, सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बाळूमामा ढोरे, प्राध्यापक रमेश मानवते ,तालुका अध्यक्ष त्र्यंबक कदम,  पत्रकार बालाजी पांचाळ ,प्रमोद अण्णा शिंदे, चव्हाण भाऊ, पंडितराव चव्हाण टेंभुर्णी सरपंच शेख हसन यासीन शेख ग्रामसेवक गीते माजी सरपंच प्रल्हादराव सवंडकर माजी सरपंच माधवराव व माजी सरपंच गजानन सवंडकर उपसरपंच गंगाधर सवंडकर सुभाष सवंडकर संजय सवंडकर ग्रामपंचायत सदस्य विजय आळणे जयवंतराव सवंडकर राजेश पाटील राष्ट्रवादी अध्यक्ष कार्यकर्ते उत्तम सवंडकर रंगनाथ सवंडकर साहेब आळणे आबासाहेब सवंडकर शंकर चेअरमन जगन्नाथ सवंडकर पांडुरंग सवंडकर जगन्नाथ आळणे विहीर कामाचे गुत्तेदार अवसरमल सर टेंभुर्णी नगरी मधील सर्व गावकरी मंडळी व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!