अर्थकारणआपला जिल्हा

महाराष्ट्र अर्बन बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त आदर्श मातांचा होनार सन्मान- रवि भुसावळे

रामु चव्हाण

11 जून रोजी येथे होणारा आदर्श मातांचा सत्कार

वसमत/ रामु चव्हाण

   वसमत तालुक्यातील नव्हेतर हिंगोली जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेचा 11 जून रोजी व 6 वा वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त वसमत तालुक्यातील आदर्श मातांचा सत्कार महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखा असलेल्या ठक्कर कॉम्प्लेक्स मेन रोड वसमत येथे आयोजित केला केला आहे.

      महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी संस्था गेली सहा वर्षापासून वसमत तालुक्यात बँकींग क्षेत्रात अग्रगण्य काम करत असून समाजातील मोलाचे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे प्रयोजन या वर्षी असुन यात आदर्श मातांचा सत्कार करण्याचे आयोजन या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

यात आपल्या पाल्यांना योग्य संस्कार योग्य शिक्षण देऊन एक आदर्श नागरिक घडविण्याचे काम माता करत असतात. त्यांचा आदर्श समाजात नेहमीच प्रेरणा देत रहावा म्हणून अशा आदर्श मातांचा सत्काराचे आयोजन यावेळी बँकेच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजू भैया नवघरे यांच्या मातोश्री विमलताई रमाकांतराव नवघरे यांच्या हस्ते तालुक्यातील आदर्श मातांचा सन्मान बँकेच्या वतीने यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष रवी भुसावळे व व्यवस्थापक संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!