आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र

अवैधरित्या व चढ्यादराने खत विक्री केल्यास कारवाई-उप. अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

     वसमत येथे दि.27.06.2022 रोजी दुपारी डॉ.सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, वसमत यांचे अध्यक्षतेखाली अवैधरित्या खत विक्रीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती
सदर बैठकीस तहसिलदार, श्री.अरविंद बोळंगे, तालुका कृषि अधिकारी श्री.गोविंद कल्याणपाड व डॉ.आर.सी.राऊत, कृषि अधिकारी, पंचायत समिती, वसमत हे उपस्थित होते.
वसमत तालुक्यात पेरणीसाठी क्षेत्र 78,900 हेक्टर असुन खातेदार संख्या 85,000 आहे.
तालुक्यात खरीप पिके कापुस, सोयाबिन पिकासाठी डी.ए.पी. खताची मागणी जास्त असुन सद्या मार्केटमध्ये खत उपलब्ध असल्याबाबत सांगीतले आहे.
अनावश्यक विक्री बाबत व्यापारी स्तरावरचा हा विषय नसुन वरच्या स्तरावरुन होत असल्याबाबत डॉ. राऊत व श्री.कल्यानपाड, तालुका कृषि अधिकारी, वसमत यांनी बैठकीत सांगितले आहे.
खत विक्रीच्या संदर्भाने प्राप्त तक्रारी च्या अनुषंगाने चढ्या भावाने खत विक्री होऊ नये यासाठी तसेच शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषि अधिकारी, पं.स. वसमत यांनी विशेष तपासणी पथक तयार करुन खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करुन फोटोसह अहवाल या कार्यालयास सादर करण्याबाबत डॉ.सचिन खल्लाळ यांनी बैठकीत निर्देश दिले आहे..
डॉ.राऊत यांनी सभेत सांगितले की, पंचायत समिती कार्यालयात अवैधरित्या खत विक्री बाबत तक्रार निवारण कक्ष फोन नं. *9028905357* असुन सदर कक्षात तक्रार घेण्यासाठी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर तक्रार निवारण कक्षाचे फोन नंबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची कार्यवाही करण्याबाबत तालुका कृषी अधिकारी व कृषि अधिकारी, पं.स. वसमत यांना उपविभागीय अधिकारी, वसमत यांनी सुचना दिल्या.


तालुका कृषी अधिकारी व कृषि अधिकारी, पं.स. वसमत यांचे तपासणी पथकाने खत विक्री केंद्रात जाऊन शेतकरी खत खरेदी करताना तपासणी करावे तसेच त्याबाबतचे फोटोसह अहवाल सादर करण्याबाबत तसेच मौजे कुरुंदयामध्ये तपासणी पथक पाठविण्याबाबतही निर्देश दिले आहे.
सदर बैठकीत कृषि अधिकारी, पं.स.वसमत यांनी सांगितले की, 15 दिवसापुर्वी सर्व व्यापारी यांचेसोबत बैठक घेण्यात आलेली असुन अनावश्यक विक्री करु नये याबाबत सर्व व्यापाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.
तालुका कृषी अधिकारी व कृषि अधिकारी, पं.स. वसमत यांनी संयुक्त पथके आजच तयार करुन खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणसी करावी व फोटोंसह त्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिल्या तसेच चढ्यादराने खतविक्री झाल्यास त्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यानी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!