आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

गणेशमूर्ती खरेदी केल्याने…वृध्दाश्रमातील निराधाराना  मिळणार आधार

रामु चव्हाण

नांदेड/ रामु चव्हाण

    गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.आपण आपल्या घरात विविध प्रकारच्या गणेशमूर्ती आनत असतो.
   पण जर गणेशमूर्तीतुन एखाद्या वृध्द निराधार वृध्दाश्रमातील वृध्दान जर आधार मिळणार असेल तर……
  हो वाचुन आश्चर्य वाटलेना.ही बातमी खरी आहे…नांदेड येथील सावली बारचे व्यवस्थापक अशिष जैस्वाल यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून आपण जी काही गणेश मूर्ती खरेदीकराल या खरेदीतून जमा झालेली संपूर्ण रक्कम ही वृद्धाश्रमातील निराधार यांना भोजन, औषधी ,कपडे,राहण्याची व्यवस्था इत्यादींच्या कामासाठी देण्यात येणार असल्याचे आशिष जयस्वाल यांनी सांगितले. त्यामुळे आपण गणेश मूर्ती खरेदी करताना सामाजिक बांधिलकी जपत या गणेश मूर्तीतून जमा झालेली रक्कम वृद्धाश्रमात देण्यात येणार असल्यामुळे आपणही या संकल्पनेला हातभार लावून गणेश मूर्ती खरेदी करून वृद्धांना एक आधार द्यावा असे आवाहन अशिष जैस्वाल यांनी केले आहे.

  त्यामुळे सदरील गणेश मूर्ती खरेदीसाठी दि.31/08/2022 रोज बुधवारी  हॉटेल सावली बार तरोडा नाका नांदेड येथे सकाळी अकरा वाजल्यापासून हे मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या गणेश मूर्ती खरेदी करून वृद्धाश्रमातील वृध्दांना आधार द्यावा असे आव्हान करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!