अर्थकारणआपला जिल्हाराजकीय

समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी झटणाऱ्या गोदावरी समुहाचे कार्य प्रेरणादाई-संजय पाचपोर

रामु चव्हाण

यांची सहकारसूर्य मुख्यालयास सदिच्छा भेट

नांदेड / रामु चव्हाण –

      सहकारी संस्था चालवणे कठीण काम असले तरी, समाज माझा आणि मी समाजाचा आहे. आपण समाजाचे देणे लागतो या उदांत हेतूने सहकारी संस्था स्थापन करणे आणि अल्पावधित त्या संस्थेचा पाच राज्यात विस्तार करणे हे गोदावरी परिवाराने करुन दाखवलेले कार्य सहकारी संस्थाच नव्हे तर प्रत्येकांसाठी प्रेरणादाई कार्य असल्याचे सहकार भारती मुंबईचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी येथे केले.
तरोडा नाका , नांदेड परिसरात नव्याने उभारलेल्या गोदावरी अर्बन सहकारसूर्यच्या मुख्यालयास संजय पाचपोर यांनी बुधवारी (ता. सात) भेट दिली. यावेळी संस्थापक तथा हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील आणि संचालक मंडळाच्यावतीने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. त्या नंतर तांबेकर यांनी पाचपोर यांना संस्थेच्या काम काजाविषयी थोडक्यात माहिती दिली व गोदावरी अर्बन संस्थेतील उच्च शिक्षित , अनुभवी, कार्यतत्पर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी श्री पाचपोर यांनी संवाद साधला व त्यांच्या कामाचे मनापासून कौतुकही केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष किशनराव वाडीकर, तेलंगणा व आंध्रप्रदेश सहकार भारतीटे प्रदेश संघटनमंत्री प्रवीण गायकवाड, गंगाधर कोलमवार, नागरी सहकारी बँकेचे संचालक तथा सहकार भारती विभाग प्रमुख रमेश शिंदे , श्री गुरुजी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी भास्कार डोईबळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री पाचपोर म्हणाले की, समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी मराठवाड्यातील गोदावरी अर्बन सारखी संस्था जेव्हा कार्य करते हे सहकार क्षेत्रातील प्रेरणादाई व सहकारप्रवृती उभारी देणारे पाऊल असल्याची गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्यच्या मुख्यालयास भेट दिल्याने अनुभुती आली असल्याची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. श्री पाचपोर यांनी दिली व गोदावरीचा हा प्रवास पाच राज्यापुरता मर्यादित न राहता तो देशभरात विस्तार व्हावा अशा त्यांनी गोदावरी अर्बन संस्थेस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गोदावरी अर्बनचे मुख्यालय प्रिंसिपल मॅनेजर विजय शिरमेवार, मुख्य शाखेचे व्यवस्थापक अविनाश बोचरे, वितरण व्यवस्थापक महेश केंद्रे, लेखा व्यवस्थापक प्रशांत कदम, प्रशासन व्यवस्थापक गोपाल जाधव, यांच्यासह गोदावरी अर्बनच्या मुख्यालयातील व मुख्य शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!