आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

वसमतकरानो सावधान व्हिडिओ कॉल करून महिला करत आहे ब्लॅकमेलिंग

रामु चव्हाण

वसमत/  रामु चव्हाण

    सध्या वसमत शहरासह तालुक्यामध्ये व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार घडत असल्याचे धक्कादायक माहिती आहे. वसमत तालुक्यात अनेकांना व्हिडिओ काॅल येत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.


सध्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने फेसबुक ,व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी वापर करणाऱ्यांची संख्या करोडो मध्ये असताना याचा फायदा घेत सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसून येत आहे. वसमत शहरात गेली अनेक महिन्यांपासून व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची खंडणी उकळण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येते. अशाच प्रकरणात वसमत शहरात गेली पाच दिवसांपासून अनेकांना अंजली शर्मा नावाच्या महिलांकडून व्हिडिओ कॉल द्वारे अश्लील व्हिडिओ करत पैशांची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार वसमत शहरात घडत आहे. या प्रकारानंतर वसमत सिटी न्यूजने तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पुढारी, डॉक्टर्स, यांच्या फेसबुक वर जाऊन पडताळणी केली असता अनेक पुढारी ,राजकीय पदाधिकारी ,व्यापारी, डॉक्टर,शासकीय कर्मचारी यांच्या फेसबुकच्या फ्रेंड्लिस्ट मध्ये या शर्मा, वर्मा नावाच्या मुलीह्या फ्रेंड असल्याचे दिसून आले.


तरी या द्वारे आवाहन करण्यात येत आहे की तात्काळ या मुलींना अनफ्रेंड किंवा अनफॉलो करावं अन्यथा आपणासही एखादा व्हिडिओ कॉल अथवा फोन आल्यास ब्लॅकमेलिंगचा प्रकार घडू शकतो. यामुळे नागरिकांनी वेळेत सावधान होऊन आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम आदींच्या सोशल मीडिया अकाउंट वरून सदरील शर्मा, वर्मा नावांच्या मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट ला ब्लॉक अथवा आणि अनफ्रेंड करावे अन्यथा एखादी अनुचित घटना घडू शकते याचे वेळीच भान ठेवून अनेकांनी आपले फेसबुक खाते यावरून फ्रेंड रिक्वेस्ट ब्लॉक कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
सदरील शर्मा वर्मा नावाच्या मुली रात्री केव्हाही व्हाट्सअप द्वारे व्हिडिओ कॉल करत असून यामध्ये अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सदरील नागरिकांना तोच व्हिडिओ टाकून पैशांची मागणी करत तसेच पोलिसात तक्रार देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करत पैशाची खंडणी वसूल करत आहेत.यामुळे नागरिकांनी वेळे सतर्क होऊन एखादा व्हिडिओ व्हिडिओ कॉल अल्यास न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. अनेकांना आलेल्या व्हिडिओ कॉल मध्ये अनेक नागरिक हे द्विधा मनस्थिती मध्ये असून पैसे न पाठवल्यास सदरील व्हिडिओ हा सोशल माध्यमांवर टाकण्याच्या धमक्या सदरील महिला व तथाकथित महिलेचे साथीदार हे पोलीस असल्याचे बतावणी करून सदरील खंडणी वसूल करत असल्याचे फोन संभाषणावर दिसून येते त्यामुळे असे प्रकार वसमत येथे घडत असून नागरिकांनी तात्काळ सायबर सेल व वसमत पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल करावी असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!