आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनदेश विदेशमहाराष्ट्र

लाल बहादूर शास्त्री विद्यालय वसमतचे विद्यार्थी भारतीय स्पेस क्षेत्रात करणार जागतिक विक्रम

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

19 फेब्रुवारी शिवजयंती चे औचित्‍य साधुन लाल बहादूर शास्‍त्री विद्यालयाचे बाल वैज्ञानिक त्‍यांचे स्‍वतंत्र पीको सॅटेलाईट लॉंच करणार..

लाल बहादूर शास्‍त्री विद्यालयाचे बाल वैज्ञानिक स्‍पेस क्षेत्रात घडविणार नवा इतिहास..

नावाजलेले वैज्ञानिक देत आहेत विद्यार्थ्‍यांना सॅटेलाईट बनविणाचे प्रशिक्षण..

डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लाँच व्हीकल मिशन २०२३ हा महत्वाकांक्षी प्रकल्प भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठीचे एक पाऊल आहे. २०२०-२०२१ मध्ये केलेल्या ‘डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम पेलोड क्युबज चालेंज’ प्रकल्पाचा पुढील टप्पा आहे. हा प्रकल्प हाऊस ऑफ कलाम येथील चालविल्या जाणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन कडून व स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांचे द्वारा राबविला जात आहे.

‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हीकल मिशन- २०२३’ या प्रकल्पात विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण चालु आहे. तसेच प्रत्यक्ष पिको उपग्रह बनविण्याची कार्यशाळा पुणे आणि नागपूर येथे घेण्यात येईल. उपग्रह बनविण्याच्या कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.
ऑनलाईन प्रशिक्षण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची ऑल इंडिया स्तरावर एक परीक्षा सुद्धा होईल. या परीक्षेत प्रथम मेरिट मध्ये येणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष परत वापरात येणारे रॉकेट बनविण्याची संधी मिळेल.
या रॉकेट चे वजन 22.5 के.जी असेल आणि उपग्रह त्यात फिट केल्या नंतर रॉकेटचे वजन 45 ते 60 केजी असेल. सदर रॉकेट 19 फेब्रुवारी 2023 रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुर येथून अवकाशात सोडले जाईल. या रॅकेट प्रक्षेपित करण्यासाठी सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकार कडून मिळविण्यात आल्या आहेत. सदर चे रॉकेट उपग्रह अवकाशात सोडल्या नंतर पॅराशूट चे साहाय्याने परत जमिनीवर लॅण्ड करेल आणि पुढील मिशनसाठी परत वापरता येईल. असा प्रयोग अमेरिकेत एलोन मास्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी 150 पिको उपग्रह सोबत असे रॉकेट हा पहिलाच प्रयोग असल्याने 19 फेब्रुवारी 2023 रोजी हा भारतीय विद्यार्थ्यांचा जागतिक विक्रम, आशिया विक्रम, इंडिया विक्रम, अस्सिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड असे विक्रम स्थापित होतील.
अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवतील आणि भविष्यात अश्या मिशन मधून डॉ. कलाम यांचे सारखे शास्त्रज्ञ तयार होण्यास आणि नवीन भारत तयार होण्यास हातभार लागेल.
या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांचे विविध गट बनविण्यात आलेले आहेत. 5 वि ते 10 वि. 11 वि 12 वि. पदवीधर, पॉलीटेकनिक आणि इंजिनीरिंग शेवटच्या टप्प्यासाठी गटानुसार ऑनलाईन ऑल इंडिया टेस्ट नुसार अशा सर्व मिळून 100 विद्यार्थ्यांची रॉकेट बनविण्यासाठी निवड केली जाईल. महाराष्ट्रात प्रकल्प मनीषा चौधरी (महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन) यांचे नेतृत्वात होत असून ह्या प्रकल्पात वसमत येथील लाल बहादूर शास्त्री इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विज्ञान शिक्षक श्री सचिन मधुकरराव लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी श्रयेश संदीप चव्हाण, सत्यम बाळासाहेब बेले, वैभवी विनोद कमळू, विजय राजेश सोनी,स्वराज गजानन पत्रे, अयुष्य विनोद कोंडेकर,पियुष महादेव बेले, गौरव गजानन सोळंके,शिवम त्र्यंबक भूतकर, वेदिका प्रभाकर चापके, कौशल राजकुमार पाटील हे सर्व बाल वैज्ञानिक हिंगोली जिल्ह्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या विद्यार्थ्यांना श्री. तान्‍हाजी भोसले (गटशिक्षणाधिकारी, पं.स. वसमत) व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप अनंतराव चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!