ताज्या घडामोडी

पालात राहणाऱ्या नागरिकांना जात प्रमाणपत्रासह राशन कार्ड चे वाटप

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत शहरात झोपडपट्टी तसेच रोड लगत  पालामध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासन व्यवस्था काय असते आणि शासनाच्या योजना काय असतात यांच्यापर्यंत कधीही शासनाच्या योजना पोहोचत नाहीत .म्हणून दरवर्षी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच असल्याचे सध्या  तरी दिसून येत आहे.

  शासन गरिबांपर्यंत विविध योजना पोहोचवी यासाठी नवीन नवीन योजनांचा भडीमार करत आहे पण या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत यामुळे अनेक नागरीक शिक्षणापासून विविध योजनांपासून वंचित राहत आहे.
अशाच वंचित अशिक्षित गरजू लोकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी नव्हे तर त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी कंबर कसली आहे.
शासन देत असलेल्या योजना ह्या जास्तीत जास्त झोपडपट्टी गरीब पालामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळाव्यात यासाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी शहरातील रोड लगत  पालात रहाणा-या वस्तीवर जाऊन तेथील नागरिकांना त्यांच्यामध्ये शिकत असलेल्या मुलांना कुणाला जातीचे प्रमाणपत्र ,कोणाला उत्पन्नाचे ,प्रमाणपत्र कोणाला रहिवासी प्रमाणपत्र ,जे गरजू गरीब आहेत त्यांना शिधापत्रिकेचे वाटप यावेळेस डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी केले.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी वसमत सिटी न्युजशी बोलताना सांगितले की शहरातील रस्त्यावर पालात राहणा हा समाज व्यवस्थेला लागलेेेलाल एक काळा डाग असून कदाचित या शहराला कुणाची नजर लागू नये या पालात राहणारे कुणी भंगार गोळा करत आहे तर कोणी रोज मजुरी करून पोट भरत आहेत पण हे करत असताना त्यांनी आपला स्वाभिमान जागृत ठेवला असून यामध्ये कुठलाही पालामध्ये राहणारा नागरिक चोरी करत नाही तर तो उपजीविकेसाठी रोज मजुरी करून आपलं पोट आणि आपली पिढी जगवत आहे.
आज या ठिकाणी या पालात राहणारे जे शिक्षण घेत आहेत अशा लेकरांना जातीचे,उत्पन्नाचे प्रमाणपत्र वाटप केले  आयुष्यामध्ये यातीलच कोणी डॉक्टर इंजिनिअर कलेक्टर होऊन हा पसरलेला अंधकार दूर करेल असं मला वाटतं त्यामुळे या  शोषित पीडित लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी दिली यावेळी त्यांच्यासोबत वसमतचे तलाठी रवी धाडवे ,पेशकर अनिल पाटील ,शेख शफी ,सोनटक्के ,जाधव कर्मचारी,शिक्षक शाम रावले आदी उपस्थित  होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!