ताज्या घडामोडी

वसमत येथे चक्क नगरसेवकावर नाली काढण्याची वेळ

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत प्रभाग क्रमांक दोन चे अपक्ष नगरसेवक दिलीप भोसले यांना स्वतः वार्डातील नाली काढण्याची वेळ आली आहे .

कारण गेले अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागांमध्ये कचरा घाणीीीच साम्राज्य पसरलेले आहेत गुत्तेदार याबाबत कुठलेही कारवाई करत नसून कचरा उचलल्या जात नाही. यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नाल्या तुंबलेले आहेत.
जागोजागी कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगरपरिषद प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही लेखी तोंडी सूचना देऊनही त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही तर गुत्तेदार रोज शहरांमध्ये साफसफाई करून बिले उचलण्यामध्ये मग््न आहे.
वसमत शहरातील बहुतांश वार्डा मध्ये हीच परिस्थिती आहे नाले तुुंबलेल्या आहेत कचरा जागोजागी पडलेला आहे तर उचलण्यास कर्मचारी येत  नाहीत णसे त्यामुळे चक्क नगरसेेवकालाच कचरा काढण्याची वेळ आज वसमत मध्ये येऊन ठेपलेली आहे.  आज शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवक दिलीप भोसले यांनी स्वतः आपल्या हाताने नाली काढत कचरा साफ करून उचलला आहे.
तरी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन शहरातील विविध भागात असलेल्या कचरा लवकरात लवकर  उचलावा अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!