अर्थकारणआपला जिल्हा

श्री. शिवेश्वर बँकेच्या कुरूंदा शाखेचा 10 वा वर्धापन दिन साजरा

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

    बँक चालवते वेळेस येणाऱ्या अडचणी कर्ज वाटप, कर्ज वसुली अत्यंत अवश्यक असून त्या मध्ये आर. बी.आय. चे कठोर असलेले नियम पाळून देखील आज हिंगोली जिल्हया मध्ये नावारुपाला आलेल्या श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँकेची प्रगती ही सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांच्या विश्वासावर सुरू आसल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी केले.

गुरूवार दि.12 रोजी श्री. शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या कुरंदा शाखेचा 10 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार तर प्रमुख पाहूणे म्हणून कुरूंदा येथील सरपंच राजेश पाटील इंगोले, नरहर कुरूंदकर संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले पाटील, बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय दलाल आदिची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे राजेश पाटील इंगोले यांनी कुरुंदया सारख्या ग्रामीण भागामध्ये सहकारी बँकेने आपली शाखा सुरू करुन या भागातील छोटया छोटया उदयोगाना व मोठया व्यापाऱ्यांना पतपुरवठा करुन त्यांच्या व्यवसायाला चालना दिली याच पध्दतीची कार्यप्रणाली ग्रामीण भागा मध्ये सुरू ठेवून व्यवसाय वृध्दीसाठी हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त् केली. यावेळी कुरूंदयाचे भुमीपुत्र डॉ. महेश काळबांडे (इस्रो येथील शास्त्रज्ञ) यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच कुरूंदा शाखेचे ठेवीदार व नियमित कर्जदार यांचा यावेळी शालश्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून गौरवीण्यात आले यावेळी बँकेचे संचालक विनोद झंवर, नागनाथ कोम्पलवार, लक्ष्मीकांत कोसलगे, वसंत चेपूरवार, भारत नामपल्ली, नारायण लासीणकर, बालाजी माळवटकर, राधाकिशन साबणे, चंद्रकांत देवणे, सचिन दगडू, अॅड दिपक कटटेकर, रमाकांत भागानगरे, कुरुंदा येथील शाखा सल्लागार लक्ष्मीकांत टेहरे, शेषराव दळवी, ईश्वर दासरे, डॉ. रत्नलाल जैन, सदाशिव गवळी, फेरोज कच्ची, हनुमंत बागल, मधुकर पाष्टे, तसेच बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!