आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र

हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू ? 25 ऑक्टोंबर ला सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पडघम सुरू होण्याची शक्यता असल्याने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रशासन ॲक्शन मोडवर दिसून येत आहे याचं कारणही असं आहे 25 ऑक्टोबर रोजी 92 वसमत विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 व मतदार यादी चे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे तसेच या बैठकीमध्ये विविध विषय यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

बैठकीचे मुद्दे –
1.बिएलए नियुक्ती
2.दिनांक 27 आँक्टो 2023 प्रारूप मतदार प्रसिध्दी.
3.नवमतदार नोंदणी.
4.महिला मतदार नोंदणी.
5.दिव्यांग मतदार नोंदणी.
6.वगळणी मतदार वाचन.
7.दुबार मतदार वगळणी.
ऎनवेळी उपस्थित मुद्दे या विषय बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र काढण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा 92 वसमत विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी माहिती पत्रकामध्ये नमूद केले आहे.
तसेच सदर 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध होणारे प्रारूप मतदार यादीत लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगर परिषद निवडणूक साठी अंतिम राहण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असून यामुळे प्रशासन सतर्क झाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!