आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

वसमत येथे महिलांचा हंडा मोर्चा नगर परिषदेवर धडकला

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

भोसले गल्ली व ब्राह्मणगल्ली महिलांचा हंडा मोर्चा तर तसेच श्रीनगर येथील नागरिकांचे पाण्यासाठी निवेदन

वसमत नगर परिषदेच्या वतीने गेली 18 ते 20 दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने व विविध मागण्यांसाठी हा मोर्चा दि.09 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी होळी ,भोसले गल्ली वसमत येथून सकाळी 11 वा निघला बॅड लावून रिकामे हंडे घेऊन हो मोर्चा नगर परिषदेवर धडकला.


दिवाळी सणाच्या तोंडावर नगरपालिकेच्या वतीने शहरातील काही भागांमध्ये जवळजवळ 20 ते 22 दिवसांत नळाला पाणी येत नसल्याने सण कसे साजरी करायचे, आमच्या मुली बाळींना कुठे पाठवायचं, पाणी नाही तर आम्ही जगायचे कसे असा संतप्त सवाल महिलांनी मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांना केला ,पाणी द्या पाणी द्या मुख्याधिकारी पाणी द्या अशा घोषणाही यावेळी महिलांनी दिल्या नगर परिषदेच्या सभागृहांमध्ये मुख्य अधिकारी आशुतोष चिंचाळकर नगराध्यक्ष श्रीनिवास बार नगरसेवक सुनील भाऊ काळे नगरसेवक काशिनाथ भोसले यांच्यासह नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये महिलांनी मुख्याधिकारी यांच्याकडे दोन दिवसात पााणी सोडण्याची विनंती केली नसता येथून आम्ही हटणार नाहीत असा पवित्र घेतला होता यावेळी मुख्याधिकारी यांनी पाणी सोडण्यात येणाऱ्या अडचणी व्होल्टेची कमतरता याबाबत महिलांना अवगत केले पण महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या गेली वीस दिवसांपासून पाणी येत नसल्याने आम्हाला त्याचे काही घेणे देणे नाहीत आम्हाला उद्यापर्यंत पाणी आले पाहिजे अशा पवित्र घेतल्यानंतर मुख्य अधिकारी यांनी दुपारी चार च्या नंतर पाणी सोडण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर महिलांनी निवेदन दिले , तसेच गुरुद्वारा परिसरातील असलेला तलाव अतिवृष्टीमुळे  फुटल्याने ते तलाव बुजून त्या तळ्यातील गाळ उपसा करावा कारण तळ्यात पाणी नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील असलेले बोर हे कोरडे ठक पडत आहेत त्यामुळे भविष्यात मोठी भीषण पाणीटंचाई या भागातील नागरिकांना पोहोचेल आता नळाला पाणी नसल्याने व बोरला पाणी कमी येत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर या तळ्यात गाळ कााढण्या  यावा. वसमत शहरात डेंगू मलेरिया यांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत डेंगू मुळे अनेक रुग्ण दगावलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर शहरात धूर फवारणी व आरोग्याच्या दृष्टीने इतर उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर,कुमुदिनी बडवणे ,आनंद बडवणे, रमेश हंबर्डे, वसंत लोहरेकर, शामराव लांडगे ,दुर्गादास पांडे, नंदकिशोर पूर्णेकर, रत्नाकर कोल्हे, विलास कुलकर्णी ,राजू पत्की ,अनंत संगवई ,आशिष सोनी ,राजेश भोसले, काशिनाथ भोसले, ज्योती हंबर्डे, सुलभा शिरडकर ,रोहिणी मसलेकर, नारायण शिंदे ,सुजाता सुखदेव ,शोभा बडवणे, शोभा पाच्छे, छाया साबळे, द्वारकाबाई सोळंके वैशाली जवळेकर मेघा कुलकर्णी,अनिता पांडे ,अनुराधा आगलावे ,सुनीता देशपांडे, वृंदा जोशी, सागरबाई भोसले ,अलका भोसले ,मंदाकिनी भोसले, सोनाली लोंढे ,शांताबाई हजारे ,विजयमाला हंबर्डे आदींच्या स्वाक्षरी आहेत तर श्रीनगर येथील नागरिकांनी हे पाहण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनावर रामराव शिंदे ,केशवराव गव्हाणे ,गोविंदराव कपाटे, बाबुराव शिंदे ,रंगनाथ कोरडे, शिवप्रसाद गुट्टे ,हनुमंता मुखाडे, भीमराव भोसले ,प्रताप मंदारे, सुनील भिसे ,सवंडकर ,भीमराव राठोड, राजाराम आदींच्या सह्या आहेत. यावेळेस शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सपोनि बोधनापोड,पोउनि राहुल महिपाळे,पोलीस कर्मचारी भोपे सह पोलीस कर्मचारी यांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!