आपला जिल्हासामाजिक

यमुना प्रतिष्ठाणच्या वतीने शनिवारी वैकुंठ रथाचा लोकार्पण

रामु चव्हाण

वसमत : रामु चव्हाण

वसमत शहराच्या वाढत्या विस्तारामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी शव नेत असताना मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब विचारात घेऊन वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार  यांनी त्यांच्या आई यमुनाबाई म्यानेवार यांच्या स्मरणार्थ यमुना प्रतिष्ठानच्या वतीने वैकुंठ रथाची निर्मिती केली व त्याचा लोकार्पण दि 09 डिसेंबर 2023 रोज शनिवारी “शिवतीर्थ” छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वसमत येथे प.पु ष.ब्र.108 वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज व प.पु ष.ब्र.108 गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषद चे कृष्णाजी देशमुख,प्रा.डाॅ.संदीपकुमार गोरे,शशीकांत पाटील,प्रकाश शहाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळेस बोलताना संयोजक सिताराम म्यानेवार म्हणाले

सर्वसामान्यांची अडचण विचारात घेऊन केलेल्या या रथाची मांडणी करण्यात आली आहे वसमत शहराचे वाढती लोकसंख्या आणि शहराचे वाढते विस्तारीकरण यामुळे अंत्यविधीसाठी नेताना स्मशानभूमीचे अंतर हे वाढत असून यासाठी नागरिकांना पायपीट करत अंत्यविधीसाठी सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जावे लागत होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी प्रेत नेत कसरत करावी लागत असे. सर्वसामान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. त्त्यामुळे यमुना प्रतिष्ठानचा वतीने आईच्या स्मरणार्थ स्वखर्चातून वैकुंठ रथ तयार केला. ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते त्या कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी येत असलेली अडचण विचारात घेतली व वैकुंठ रथ तयार करण्याचे ठरविले. त्यानुसार हा रथ तयार करून त्याचे लोकार्पण करण्यात येत आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी असलेली अडचण काही प्रमाणात दूर होणार आहे. या वैकुंठ रथामुळे वसमत तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. तरी या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित रहावे असे आवाहन सिताराम म्यानेवार ( उपनगराध्यक्ष न.प.वसमत )व गणेशराव काळे ( प्रखंंड अध्यक्ष  अध्यक्ष विश्व हिंदू परिषद वसमत   व सिताराम म्यानेवार मित्र मंडळाचा वतीने करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!