आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

अभिनव राम मंदिरात उद्या होणार महाभिषेक व महाआरती

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

गेली पाचशे वर्षांचे प्रतीक्षा संपत आयोध्या मधील श्रीरामलल्लाची मूर्ती 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होत आहे. याचा आनंदोत्सव संपूर्ण जगामध्ये साजरा होत असताना वसमत शहरातही विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वसमत शहरातील पुरातन अभिनव राम मंदिर,पोलीस क्वार्टर रोड वसमत येथे प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी 8 ते 9 वा महा अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच 9 ते 12 या वेळेमध्ये संकल्पपुर्ती रामराघव महायज्ञ,पूर्णाहुती व भक्तांना महाप्रसादाचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे .तसेच सायंकाळी सहा ते आठ या वेळामध्ये राम दिवाळी उत्सव या निमित्ताने सामूहिक रामरक्षा पठण, आतिषबाजी व महाआरती करण्यात येणार आहे तरी या सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक पूर्णवाद परिवार वसमत व मी वसमतकर प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!