आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

मनोज जरांगे पाटलांची कुरूंद्यात आरक्षण एल्गार सभा .

रामु चव्हाण

मनोज जरांगे पाटलांची कुरुंदयात आरक्षण एल्गार सभा

सभेला हजारो मराठा बांधव राहणार उपस्थितीत राहणार

वसमत  / रामु चव्हाण

मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारची झोप उडवणारे मनोज जरांगे पाटील 2 आक्टो . रोजी कुरुंदा येथे आरक्षण एल्गार सभा घेणार आहेत . सभेसाठी वसमत तालुक्या सह आजूबाजुच्या जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .
सरकारने एक महिण्यात मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले परंतू सरकारला दिलेल्या आश्वासनाचा नेहमी प्रमाणे विसर पडू नये याची खबरदारी व समाजा मध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी राज्यभर दौरा करणार आहेत . या दौर्यामध्ये गाठीभेटीच्या माध्यमातून ते समाजाशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान जरांगे पाटलांचे उपोषण सुरू असताना त्यांच्या उपोषण ला पाठिंबा म्हणून सुरू करण्यात आलेले कुरुंदा येथील स्मशानभूमीतील आमरण उपोषण चर्चेचा विषय बनले होते व या भागातील आरक्षण चळवळीचे केंद्र बिंदू ठरले होते . त्यामुळे प्रशासनाला सुध्दा या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती .
त्या पार्श्वभूमी वर जरांगे पाटील यांच्या दौर्या दरम्यान कुरुंदा येथे 2 आक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता दूर्गादेवी मंदिर परिसरातील दीड एकर भव्य प्रांगणात भव्य आरक्षण एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे . या सभेची तयारी कुरुंदा व परिसरातील २० ते 25 गावातील तरुण करत आहेत . सभेपूर्वी अनेक समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे . या सभेची परिसराती जोरदार चर्चा असून सभेला मराठा समाजीतल हजारो महिला , पुरुष . तरूण , विद्यार्थी उपस्थित राहतील असे सकल मराठा समाज वसमत तालूका व कुरुंदा च्या वतीने कळविण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!