आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसमत शहरात डेंगू ची साथ, नगरपरिषदेचे दुर्लक्ष

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरात सध्या डेंगूचा थैमान सुरू असून डेंगू मुळे वसमत शहरातील खाजगी रुग्णालय हाउसफुल झालेले आहेत प्रत्येक रुग्णालयात लहान मुले नागरिक उपचार घेत असताना दिसत आहे.
शहरात डेंगू मुळे पाच जणांना जीव गमावाव लागला असल्याची चर्चा वसमत शहरात ऐकावयास मिळत आहे.

डेंगू ने चांगलेच थैमान शहरात घातले असताना नगरपालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असताना दिसून येत आहे. नगरपालिकेला याचा थांग पत्ताही नसल्याचे यावेळी दिसून येत.

वसमत नगर परिषदने शहरातील प्रत्येक वार्डामध्ये धूर फवारणी करावी अन्यथा दिवसेंदिवस या रुग्णसंखेमध्ये वाढ होऊन यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतील याकडे गांभीर्याने नगर परिषदेने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांत होत आहे
सध्या वसमत शहरांमध्ये प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये बऱ्याच रूग्णांना ताप व थंडीचे लक्षणं आहेत त्यांनी अंगावर न काढता तज्ञ डॉक्टरांकडे जाऊण उपचार करावेत व आरोग्याची काळजी घ्यावी.आपला परिसर स्वच्छ ठेवावा डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सभोवताली असलेले पाण्याचे डबके ,घरातील कुलर आदी कोरडे करावे ,तसेच डबक्यात पाणी साचू नये यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डाॅ सनाउल्ला खान यांनी केले आहे

सध्या रुग्णालयात रूग्णाची संख्या वाढत असल्याने बेड मिळणेही कठीण झाले आहे वसमत शहरात काही दिवसांपासून पाच जणांचा मृत्यू डेंगू ने झाला असल्याची चर्चा आहे. तरी सर्व नागरीकांनी दक्षता बाळगून लहान मुलांसह सर्वानी काळजी घ्यावी. व नगर परिषदेने लवकरच यावर उपाय योजना करत धूर फवारणी करावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!