आपला जिल्हाराजकीय

सौ.उज्वलाताई ताभांळे यांच्यावर वसमत विधानसभेच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत विधानसभेच्या लोकप्रिय नेत्या तथा हिंगोली भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष सौ उज्वलाताई तांभाळे यांची भारतीय जनता पार्टीच्या महा विजय 2024 वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती केल्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच दिले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने पक्षांतर्गत फेरबदल केले जात असून वसमत विधानसभेमध्ये या अगोदर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी अॅड शिवाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली होती पण त्याजागी आता भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा सौ. उज्वलाताई तांभाळे यांची निवड करण्यात आली आहे. सौ. उज्वलाताई तांभाळे यांचा दांडगा जनसंपर्क व नुकत्याच झालेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची दाखल घेत त्यांना वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड केली आहे.
यावेळी सौ. उज्वलाताई तांभाळे यांनी भारतीय जनता पक्षाला वसमत विधानसभेमध्ये एक नंबरचा पक्ष करण्याचा मी प्रयत्न करणार असून आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभा ,विधानसभा त्याचबरोबर जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये वसमत विधानसभेमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष राहील यासाठी आपण प्रयत्न करणार असून वसमत विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये सर्व निवडणुका या पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे आगामी काळात भाजपच हा वसमत विधानसभेमध्ये एक नंबरचा पक्ष राहील असा ठाम विश्वास भाजपाच्या वसमत विधानसभेच्या नूतन निवडणूक प्रमुख सौ. उज्वलाताई तांभाळे यांनी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!