अर्थकारणआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून दिवंगत कविरत्न रंजन इंगोले यांच्या परिवाराची भेट; १ लाखांचा धनादेश सुपूर्द

संपादक: हरनामसिंग चव्हाण

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून दिवंगत कविरत्न रंजन इंगोले यांच्या परिवाराची भेट; १ लाखांचा धनादेश सुपूर्द

वसमत:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. श्री. रामदासजी आठवले साहेब आज वसमत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वसमत येथील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत कविरत्न रंजन इंगोले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. इंगोले परिवाराचे दुःख वाटून घेत आठवले साहेबांनी त्यांना धीर दिला व परिवाराला आर्थिक मदत म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश (चेक) सुपूर्द केला.
यानंतर सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथील सभागृहात दिवंगत रंजन इंगोले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला-भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी दिवंगत रंजन इंगोले यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शासकीय विश्रामगृहात जंगी स्वागत
तत्पूर्वी, मा. श्री. रामदासजी आठवले साहेब यांचे वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. यावेळी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांतभैय्या नवघरे यांनी आठवले साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.
तसेच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार केला. या स्वागत सोहळ्याप्रसंगी महायुतीसह सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र सौजन्य: नागेश चव्हाण, वसमत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!