वसमत येथे अत्याधुनिक ‘व्हिजन सेंटर’ सुरू होणार; लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात घोषणा
संपादक:हरनामसिंग चव्हाण

वसमत येथे अत्याधुनिक ‘व्हिजन सेंटर’ सुरू होणार; लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात घोषणा
वसमत CT NEWS संपादक:हरनामसिंग चव्हाण
वसमत:
तालुक्यातील ग्रामीण व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार नेत्रसेवा मिळण्यासाठी लवकरच अत्याधुनिक ‘व्हिजन सेंटर’ (नेत्र तपासणी व उपचार केंद्र) सुरू करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा एससीए लायन दिलीप मोदी यांनी केली. लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या तिसऱ्या भव्य पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. शनिवार, दि. १८ जुलै रोजी हॉटेल कन्हैया येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
नूतन कार्यकारिणी (सन २०२६-२७) व शपथविधी
इन्स्टॉलेशन ऑफिसर व्हीडीजी-२ लायन सुप्रिया कोतवाल यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. मावळते अध्यक्ष लायन राजू सिद्दिकी यांनी नूतन अध्यक्षांकडे सूत्रे सुपूर्द केली.
अध्यक्ष लायन संजीव बेंडके
सचिव कल्याण कुरुंदकर
कोषाध्यक्ष संदीप चव्हाण
उपाध्यक्ष मोहम्मद गौस बागवान (प्रथम), शेख इमरान शेख नूर (द्वितीय)
७ नव्या सदस्यांचा प्रवेश
क्लबचा विस्तार करत सात नव्या सदस्यांना (लायन शंकर शिंदे, प्रसाद लालपोतू, विजय लांडगु, अंबादास मनी, इंजि. अमित अवसरमल, विश्वंभर बोखारे, शिवानंद लेंडाळे) इंडक्शन ऑफिसर लायन सुरभी माहेश्वरी यांनी लायन्स परिवारात समाविष्ट करून घेतले.
महत्त्व या ‘व्हिजन सेंटर’मुळे वसमत तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांना डोळ्यांच्या उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज पडणार नाही.
या सोहळ्याला लायन प्रदीपजी गोलेच्छा, सुनीलजी मुथा, डॉ. मोहन देशमुख यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केले.



