आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रसामाजिक

वसमतमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रविवारी पथसंचलन

रामु चव्हाण

वसमतमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रविवारी पथसंलन

वसमत -रामु चव्हाण

विजयादशमी, प्रभू श्रीरामांचा रावणावर आणि दुर्गामातेचा महिषासुरावर विजयाचे स्मरण देणारा दिवस. याच दिवशी १०० वर्षांपूर्वी पूजनीय डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस असून, संघाच्या प्रमुख सहा उत्सवांपैकी एक असणारा हा विजयादशमीचा उत्सव यंदा १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने वसमत नगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वसमत तालुक्याच्या वतीने  विजयादशमी उत्सव चे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे – नाईक श्री. विश्वनाथजी डाके (माजी सैनिक व योग शिक्षक)

प्रमुख वक्ते – श्री. सिद्धेश्वरजी बिराजदार (धर्मजागरण प्रमुख, देवगिरी प्रांत)

दिनांक -अश्विन शुक्ल सप्तमी शके १९४८,

१८ ऑक्टोबर २०२६, रविवार (युगाब्द ५१२८)

वेळ –
– पथ संचलन  सायं. ठीक ४:०० वाजता निघेल.
-शस्त्रपूजन उत्सव – सायं. ५:३० ते ६:३०

स्थळ -श्री अभिनव राम मंदिर, बँक कॉलनी, वसमत.

आवाहन -तालुका संघचालक डॉ. निलेश डिग्रसे यांनी सर्व स्वयंसेवक बंधू व नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्वयंसेवकांसाठी सूचना – सर्व स्वयंसेवकांनी उत्सवस्थळी दुपारी ३:३० वाजता पूर्ण गणवेशात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!