वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील नामांकित डॉ. सनाउल्ला खान व डॉ. हीना खान यांचे माहेर हॉस्पिटल हे काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे.त्या बाबत त्यानी जनतेस जाहीर आवाहन केले आहे की सर्व रुग्ण आणि नागरिकांना कळविण्यात येते की, डॉ. सनाउल्ला खान व डॉ. हिना खान हे दिनांक १ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान पवित्र उमरा यात्रेसाठी रवाना होत आहेत. या कालावधीत माहेर हॉस्पिटल पूर्णपणे बंद राहील.
रुग्णांसाठी महत्त्वाचे आवाहन:
डॉ. सनाउल्ला खान सरांचे रुग्ण: मधुमेह (शुगर), रक्तदाब (बीपी), थायरॉईड, हृदयरोग व इतर आजारांवरील उपचार घेणाऱ्या रुग्णांनी १ डिसेंबरपूर्वी हॉस्पिटलमध्ये येऊन आपली नियमित तपासणी व औषधोपचार करून घ्यावेत.
डॉ. हिना खान मॅडम यांचे रुग्ण: सर्व गरोदर माता व स्त्रीरोग विषयक उपचार घेणाऱ्या रुग्णांनी १ डिसेंबरच्या अगोदर आपली तपासणी पूर्ण करून घ्यावी.
हॉस्पिटल बंद असताना कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा त्रास होऊ नये, यासाठी सर्व रुग्णांनी वरील तारखेपूर्वीच तपासणी करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती असे आवाहन माहेर हाॅस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.
Back to top button
Don`t copy text!