आपला जिल्हामहाराष्ट्र

वसमत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची तहसीलदार सारंग चव्हाण यांनी घेतली  सांत्वनपर भेट

रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबीयांची तहसीलदार सारंग चव्हाण यांनी घेतली  सांत्वनपर भेट

वसमत  / रामु चव्हाण

   राजवाडी येथील एक तर कुरुंदा येथील तीन शेतकरी कुटुंबीयांना धीर, तातडीची मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार – तहसीलदार सारंग चव्हाण

वसमत तालुक्यात गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून तालुक्यात ५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या पार्श्वभूमीवर वसमतचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यामध्ये राजवाडी येथील १ आणि कुरुंदा गावातील ३ शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीय सोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतीतील सततचा तोटा, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र यावेळी समोर आले.

यावेळी बोलताना तहसीलदार सारंग चव्हाण म्हणाले,

ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार जी तातडीची आर्थिक मदत आहे, ती तात्काळ मिळावी यासाठी आम्ही शासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करू. कोणतेही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.त्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे आणि प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याचे निर्देश दिले.

या भेटीमुळे पीडित कुटुंबीयांना काही प्रमाणात धीर मिळाला असला तरी, वसमत तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे वाढते सत्र चिंताजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे. शासनाने फक्त मदतच नव्हे तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!