वसमत दिनांक 28 ऑगस्ट 2024 वार बुधवार तालुक्यातील आडगाव रंजे येथे सकाळी साडेबाराच्या सुमारास तलाठी कार्यालय येथे कर्तव्यावर असलेले पवार तलाठी याना एक अज्ञात तरुण मोटरसायकलीवर आला आणि त्याने पवार यांना विचारणा केली ग्रुप वर मेसेज का टाकला म्हणत वाद घातला यावरून त्यांची बाचाबाची झाली लगेच त्यांनी सोबत मिरची पावडर आणली होती सदरील मिरची पुड ही पवार तलाठी यांच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर टाकून चाकूने हल्ला केला आणि मोटरसायकलवर सावंगी रोडच्या दिशेने धूम ठोकली. यात पवार हे गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती आहे. पवार तलाठी यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रकृती गंभीर होती पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.