हिंगोली जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी ॲड. के.के. शिंदे व उपाध्यक्ष पदी सुभाषराव भोपाळे यांची बिनविरोध निवड
जिल्हा स्तरीय शिक्षण प्रशिक्षणाचे शिखर संस्था म्हणुन जिल्ह्यात काम करण्याऱ्या हिंगोली जिल्हा सहकारी बोर्ड. मर्या. हिंगोली या बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीची होऊन बोर्डाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी अनोज वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली बोर्डाच्या कार्यालयात हिंगोली येथे दि. 02/01/2026 रोजी घेतली असता अध्यक्ष म्हणुन ॲड. के.के. शिंदे व उपाध्यक्ष पदी सुभाषराव भोपाळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
बोर्डाच्या संचालक पदी बी.बी. देशपांडे, के.जी.नरवाडे, जी.बी.श्रुंगारे, जी.पी.भुसारे, वाय.एस.थिटे, एस.व्ही.सराफ, एस.डी.कदम, जी.बी.देशमुख, एन.सी.खेडेकर, ओ.जी.कोटकर, ए.डी.ठेंगळ, डी.एम. ढोबळे, महिला प्रतिनीधी सौ.माधवी पाटील, सौ. भारती अनिल नायक सवनेकर यांची निवड झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अंतर्गत महाराष्ट्रात 33 जिल्हा सहकारी मंडळ, 13 सहकार प्रशिक्षण केंद्र व 05 विभागीय सहकारी मंडळे यांच्या माध्यमातुन राज्यात सहकार शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार व प्रसिध्दीचे कामकाज अविरतपणे सर्व प्रकारच्या सहकारी संस्थातील सहकारी सभासद, संचालक, पदाधिकारी व कर्मचारी यांचेकरीता सहकारी प्रशिक्षणाचे काम चालु आहे. त्याचाच एक भाग म्हणुन या जिल्ह्यात हिंगोली जिल्हा सहकारी बोर्ड मर्या. हिंगोली हि जिल्हा स्तरिय शिक्षण, प्रशिक्षण देणारी शिखर संस्था आहे. अशा या जिल्हा स्तरीय सहकारी शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुक होऊन पदाधिकारी निवड झालेली आहे. या बोर्डाच्या निवडणुकीसाठी बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री. एस.एन.लुटे यांनी कामकाज केले. पदाधिकारी व संचालक मंडळाचे सर्व सहकार क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.