वसमत तालुक्यात शनिवार दिनांक 17/02/2024 रोजी दोन मोठ्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा योद्धा मनोजदादा जरांगे हे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने दि.17/02/2024 रोज शनिवार वसमत तालुक्यातील
वसमत-आसेगाव-निळा – नांदेड रोड वरील टाकळगाव पाटीवर सकाळी 8 ते 4 वा पर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
तर वसमत -कौठा-औंढा रोड वरील बोराळा कौठा चौफुली पाटीवर सकाळी 9 ते 2 या वेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत यांना दिले आहे.
यामुळे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहे.