वसमत तालुक्यातील 12 सर्कल मध्ये होणार चक्का जाम आंदोलन ?
वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील बारा सर्कल मध्ये उद्या चक्काजाम आंदोलन होण्याची शक्यता ?
मराठी योद्धा मनोजदादा जरांगे हे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने दि.16/02/2024 रोज शुक्रवारी वसमत तालुक्यातील बारा सर्कलमधील मुख्य रस्त्यांवर राष्ट्रीय महामार्ग ,राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग या रस्त्यांवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे.
अंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण त्यांची प्रकृती खालावली असून लवकरात लवकर शासनाने अधिवेशन बोलावुन सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून दिनांक 16 फेब्रुवारी रोजी वसमत तालुक्यातील 12 सर्कल जसे की अंबा,कौठा,आसेगाव,बाभुळगाव,हयातनगर,टेंभुर्णी,हट्टा,कुरूंदा,खांडेगाव,करंजाळा,गिरगाव,पांगरा शिंदे या सर्कलचा च्या वसमत -परभणी रोड ,जिरो फाटा – नागेशवाडी रोड ,औंढा – वसमत रोड ,वसमत -कौठा-कुरूंदा रोड ,कुरूंदा-बोल्डा रोड,औंढा-नांदेड रोड,पळसगाव -वसमत रोड ,वसमत-आसेगाव-नांदेड रोड ,वसमत -कारखाना-बाभुळगाव रोड या रस्त्यावरील गावोगावी पाट्यांवर हा रस्ता रोको करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
यासाठी हट्टा ,कुरूंदा पोलीस स्टेशन मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आल्याची माहीती आहे.