नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी 21 नोव्हेंबर हे शेवटची तारीख असल्याकारणाने आज 41 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. यामध्ये दोन नगराध्यक्ष पदाचे तर 39 जणांनी सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले .पण यामध्ये नगराध्यक्ष व सात प्रभागात तील उमेदवारांनी आक्षेप दाखल केल्याच्या कारणामुळे सात प्रभाग आणि नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटचा दिनांक हा 25 नोव्हेंबर रोजी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी सांगितले .
कारण या सात प्रभाग आणि नगराध्यक्ष पदासाठी न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याकारणाने 25 नोव्हेंबर पर्यंत त्यांना अपील दाकल केले असल्यामुळे 25 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपला उमेदवार अर्ज मागे घेता येणार आहे.
यात नगराध्यक्ष पदासाठी पूजा नाईकवाडे यांचा तर प्रभाग क्रमांक 14 अ मधून प्रभावती खंदारे ,प्रभाग क्रमांक 8 ब कैलास निकाळजे, प्रभाग क्रमांक 1 मधुन सागर बहने, तर प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये विकास मोरे ,प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये मंगला मोरे ,प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये विनायक साखरे ,प्रभाग क्रमांक 6 ब मोहम्मद अजगर हुसेन यांचे अपील दाखल असल्याकारणामुळे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी या प्रभागातील उमेदवारान आपले उमेदवारी अर्ज दुपारी 3 वाजेपर्यंत परत घेता येणार आहे. यामुळे नागरिक आणि उमेदवारांमध्ये काही प्रमाणात आज संभ्रम निर्माण झाला होता.21 नोव्हेंबर शेवटची तारीख असताना अचानक 25 नोव्हेंबर का वाढली हे नागरिकांना कळत नव्हते. अनेकांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज परत घेतले नाहीत पण ज्या प्रभागांमध्ये अपील दाखल नव्हते त्या प्रभागातील उमेदवारांना आजच शेवटचा दिनांक असल्याकारणाने आपले उमेदवारी अर्ज वापस घ्यावे लागणार होते तर ज्या प्रभागांमध्ये अपील आहे असे उमेदवारांना 25 नोव्हेंबर रोजी आपले अर्ज परत घेता येणार आहेत.