आपला जिल्हाक्राईम स्टोरीमहाराष्ट्र

जि.मध्यवर्ती बँकेवरील दरोड्यातील 9 आरोपी जेरबंद

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील चोंडी अंबा येथे बँक मॅनेजरवर दरोडा टाकुन पैशाची बॅग घेवुन फरार झालेले दरोडेखोर आंध्रप्रदेश मथुन जेरबंद, १२ तासात दरोडयाचा उलगडा (२० लाखाचा मुददेमाल जप्त ).
स्थागुशा हिंगोली व पोस्टे कुरुंदा यांची कार्यवाही.
( पोलीस पथकाने सलग १६०० किमी चा प्रवास करून आरोपींना ठोकल्या बेडया)

दिनांक ०९/०१/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास फिर्यादी नामे ज्ञानोबा बालाजी भोसले वय ४६ वर्षे व्य. बँक मॅनेजर, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चोंडी यांनी ०८ लाख रूपये रोख रक्कम असलेली बॅग घेवुन मोटारसायकलने वसमत ते चोडी येथे जात असताना कोर्टा पाटी जवळ आले असता एका पिकअप ने जोरदार धड़क दिली त्यामुळे ते रोडच्या बाजुला जखमी अवस्थेत पडले असता पाठीमागुन आलेल्या दरोडेखोरांनी त्यांची पैसे असलेली बॅग बळजबरीने चोरून नेली. त्यासदभनि पोस्टे कुरूंदा येथे गुरनं ०५/२०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधिक्षक श्री नीलाभ रोहन यांनी स्थागुशाचे पोनि श्री मोहन भोसले याना सुचना देवुन त्यांच्या नियंत्रणात सपोनि श्री शिवसांब घेवारे व सपोनि श्री राम निरदोडे यांचे पथक नेमण्यात आले. पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून जबरी चोरी करणारे व आरोपीच टिप देणारे ०३ आरोपीस अटक केले होते परंतु उर्वरीत ०६ आरोपी पैशाची बॅग घेवून फरार झाले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून व गोपणीय माहितीच्या आधारे माहिती मिळविली की उर्वरीत ०६ दरोडेखोर हे तिरूपती येथे जात असुन ते सध्या आंध्रप्रदेश राज्यात बापटला शहरात आहेत त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री घेवारे व पोउपनि श्री गंधकवाड यांचे पथक तात्काळ आंध्रप्रदेशात रवाना होवुन बाफ्टला रेल्वे स्टेशन परिसरात छापा मारून ०६ आरोपी व रोख रक्कम ६,७०,०००/- रू (सहा लाख सत्तर हजार रू > ताब्यात घेण्यात आले आहे.

आजपर्यंत सदर गुन्हयात एकुण ९ आरोपी नामे पोलीस स्टेशन कुरुंदा गुन्हा रजिस्टर नंबर 5 /26 कलम 310 (2) , 311 BNS मधील मधील आरोपी 1) बालाजी उर्फ ठाकूर किशनराव पांनधोंडे वय 29 राहणार पळसगाव तालुका वसमत. 2) नागनाथ विठ्ठल खराटे राहणार भोगाव तालुका वसमत 3) ओमकार भोजाजी गव्हाणे वय 23 राहणार भोगाव तालुका वसमत. 4) बालाजी बबन डाखोरे वय 25 राहणार पळसगाव तालुका वसमत 5) महेंद्र अंबादास कांबळे मुंबई 25 राहणार भोगाव. 6) ओमकार मोतीराम कदम वय 23 राहणार भोगाव.7) ऋषी उर्फ सत्यम इंगोले वय 22 राहणार पळसगाव 8) नागेश अच्युत गाढवे वय 25 राहणार भोगाव 9) भागवत शिवाजी कदम वय 24 राहणार एकुर्गा सर्व तालुका वसमत जिल्हा हिंगोली असे निष्पन्न झाले असुन चोरलेली रोख रक्कम व गुन्हयात वापरलेले वाहने असा एकुण २०,००,०००/- रू (वीस लाख रू) चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात आणखी आरोपीचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करीत असुन सदर आरोपी कडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

संदरची कामगिरी मा.श्री. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधीकारी वसमत, पोनि मोहन भोसले स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांव घेवारे, सपोनि रामदास निरदोडे, पोउपनि पंढरी गंधकवाड, पोउपनि उमेश कारामुंगे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, भगीरथ सवंडकर, संदीप टाक, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, चालक सोनवणे, गजानन भालेराव, नामदेव कोटकर, वसमतकर, रवी मिनजगी, साठे, इरफाण पठाण, दत्ता नागरे, मारोती काकडे, प्रदीप झुंगरे, प्रणिता मोरे यांनी केली असुन मा.पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!