वसमत शहरातील पोलीस स्टेशन ,महावीर चौक ते झेंडा चौक व कापड लाईन, मामा चौक हा रस्ता प्रमुख व्यापारी प्रतिष्ठाणे असलेला रस्ता असून विविध प्रकारच्या खरेदीसाठी वसमत शहरातील तसेच ग्रामीण भागतील नागरीकांना या रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. मुळातच हे रस्ते अरुंद आहेत, त्यातच या रस्त्यावरून मोटारसायकल, ऑॅटो, चारकारी वाहनांच्या रहदारीमुळे अनेकवेळा रस्ता ब्लॉक होन ट्रॉफीक जाम होते. तसेच व्यापारी आस्थापनेसमोरील अस्ताव्यस्त वाहन पार्कींग देखील ट्रॉफीक जामसाठी कारणीभूत आहे.
आता महिलांचा मकरसंक्रात सण असून मोठया प्रमाणावर महिला खरेदीसाठी तसेच गृहभेटीसाठी फिरतात. परंतु रस्त्यावरील रहदारी, ट्राफीकमुळे त्यांची प्रचंड गरसोय होते. त्यामुळे मकर संक्रात सणामुळे येत्या 8 दिवसापर्यंत वरील रस्त्यावर बॅरीकेंटींग करुन थ्री व्हीलर, फोर व्हीलर वाहनास बंदी करावी तसेच पार्कींग व्यवस्था सुरळीत करावी जेणेकरुन महिलांना रहदारी व ट्रॉफीकचा त्रास होणार नाही तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे निवेदन वसमत शहर पोलीस स्टेशन येथे नगराध्यक्षा सौ सुनिताताई बाहेती यानी दिले आहे.