आपला जिल्हा
वकील संघाचा अध्यक्षपदी अॅड साखरे तर सचिव पदी अॅड मुरूंबेकर यांची भरघोस मतानी निवड
रामु चव्हाण

वसमत : रामु चव्हाण

वसमत वकील संघाच्या 2025-27 कार्यकाळासाठी निवडणूक शांततेत पार पडली.
यंदा अध्यक्षपदी ॲड. राजेंद्र साखरे, उपाध्यक्षपदी ॲड. शेख मोसिन, सचिवपदी ॲड. दीपक मुरंबेकर यांची निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी ॲड. नाहीद सिद्दीकी. सहसचिव ॲड. केतनकुमार सारंग, ग्रंथालय सचिव ॲड. विनोद खोत आणि महिला प्रतिनिधी ॲड. साक्षी जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे संघातील ऐक्य आणि सहकार्याची भावना यावेळी स्पष्ट दिसली.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी ॲड. वाय. के. देलमाडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर त्यांना सहाय्यक अधिकारी ॲड. विश्वास सत्यविजय अनवेकर आणि ॲड. दीपक गुंडले यांचे सहकार्य लाभले.
नव्या नेतृत्वामुळे संघ आगामी काळात अधिक सक्रिय उपक्रम राबवेल, अशी अपेक्षा वकिलवर्गाने व्यक्त केली.यावेळेस वसमत पत्रकार संघाचा वतीने निवड झालेल्या वकील संघाचा सत्कार करण्यात आला यावेळेस पत्रकार प्रवीण वाघमारे ,रामु चव्हाण,अॅड चंद्रकिरण डोंगरे,सुनिल ददगाळे आदी उपस्थित होते.




