वसमत न्यायालयातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
वसमत – रामु चव्हाण
वसमत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातून अॅड. सुदर्शन भालेराव यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही तासात या गुन्ह्याची उकल करत चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की वसमत जिल्हा व सत्र न्यायालय येथील अॅड सुदर्शन मनोहर भालेराव यानिमित्त दि.13 ऑक्टोबर रोजी त्यांची स्पेल॔डर मोटारसायकल MH 38 AC 2499 हे पार्किंग लावुन न्यायालयात गेल्या नंतर दुपारी 2 वा सुमारास ते बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांची मदत आढळून आली नाहि. यावेळेस त्यानी वसमत शहर पोलीस स्टेशन येथे 16 ऑक्टोबर म्हणजे काल तक्रार दाखले केलि असता .स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाचा आत सदरील गुन्हा उघडकीस आणला असुन या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना LCB पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आरोपीत सुनील भिमराव भ्रिगणे, वय 45 वर्षे, रा. बँक कॉलनी, वसमत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्या ताब्यातून न्यायालय आवारातून चोरीस गेलेली एक जुनी वापरती हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (MH 38 AC 2499) किंमत अंदाजे 35,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीस मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन वसमत शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
LCB ची उत्कृष्ट कामगिरी
सदरची धडाकेबाज कारवाई PSI जिव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील – पोना 57 कोकरे, पोना 873 जाल्मिरे, PC 990 गोरे, PC 892 गुंजकर – नेमणूक LCB शाखा, हिंगोली यांनी केली आहे.या जलद कारवाईमुळे वसमत न्यायालय परिसरातील वकिल व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, LCB पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Back to top button
Don`t copy text!