मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख रामेश्वरजी नाईक यांची वसमतमध्ये पत्रकार हरनामसिंग चव्हाण यांना सदिच्छा भेट; साधेपणा व आपुलकीचे सर्वत्र कौतुक!
वसमत (दि. १८ ऑक्टोबर): रामु चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख तथा ओ.एस.डी. श्री. रामेश्वरजी नाईक हे वसमत दौऱ्यावर असताना त्यांनी येथील ज्येष्ठ पत्रकार हरनामसिंग चव्हाण यांची विशेष सदिच्छा भेट घेतली. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून रामेश्वरजी नाईक यांनी दाखवलेल्या या आपुलकीची आणि स्नेहाची वसमत शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
“एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असतानाही रामेश्वरजी नाईक साहेबांनी आवर्जून आठवण ठेवून माझी भेट घेतली,” अशा भारावलेल्या शब्दांत पत्रकार हरनामसिंग चव्हाण यांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले.
सिकलीगर समाजाचे ‘गळ्यातील ताईत’ रामेश्वरजी नाईक
शासनाच्या वतीने नुकत्याच अत्यंत दिमाखात पार पडलेल्या ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ सोहळ्यात गुरुनानक नाम लेवा संगतासोबतच सिकलीगर समाजाला समान मंच आणि न्याय मिळवून देण्यात रामेश्वरजी नाईक यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासूनच ते सिकलीगर समाजाचे ‘गळ्यातील ताईत’ बनले असून, समाजाच्या प्रत्येक अडअडचणीत आणि सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची राज्यभरात नवी ओळख निर्माण झाली आहे.
पुष्पगुच्छ व भव्य हार घालून जंगी सत्कार
रामेश्वरजी नाईक साहेबांच्या या अचानक परंतु अत्यंत आपुलकीच्या भेटीने प्रेरित झालेल्या उपस्थितांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व भव्य हार अर्पण करून जंगी नागरी सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या स्नेहमय सत्कार प्रसंगी मंचकराव काळे, अमित काबरा, संजय टाक, उत्तममामा करवंदे, सुरेश धोत्रे, मरिअन्ना वाघमारे, दिनेश भुजवणे, तुफान सिंग, सतूसिंग, अजय सिंग, कुलदीप सिंग यांच्यासह शहरातील अनेक नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. उच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असणारे आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडून ठेवणारे नेते म्हणून श्री. रामेश्वरजी नाईक यांच्या या भेटीचे वसमतवासीयांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
Back to top button
Don`t copy text!