वसमतचा ऐतिहासिक दसरा हायजॅक होतोय का? चार दशकांची परंपरा धोक्यात, परवानगी एकाची अन् साहित्य दुसऱ्याचेच!
वसमत (प्रतिनिधी) :
वसमत शहराचा चार दशकांपासूनचा ऐतिहासिक आणि पारंपरिक दसरा उत्सव यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासकीय परवानगी एका संस्थेची मिळाली असताना दुसऱ्याच व्यक्तीने परस्पर साहित्य आणून टाकत विना परवानगी दसरा चालवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामुळे वसमतच्या दसऱ्यावर अतिक्रमण होतंय का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
*काय आहे प्रकरण?*
मिळालेल्या माहितीनुसार, वसमत येथील दसरा उत्सव गेल्या 40 वर्षांपासून एकाच परंपरेने, शिस्तीत आणि रितिपरंपरेने प्रशासनाच्या अधिकृत परवानगीने चालत आला आहे. यंदाही या उत्सवाची सर्व प्रशासकीय परवानगी संबंधित आयोजकाला मिळाली आहे.
मात्र, दुसऱ्या काही व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, थेट कार्यक्रमाच्या जागेवर मंडपाचे साहित्य, लाईट, साऊंड सिस्टिम ,झुले ,आकाश पाळणे आणून टाकले आहे. स्वतःच दसरा भरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आयोजक गणेशराव काळे यानी केला आहे.
> “परवानगी आम्हाला आहे, कागदपत्रे आमच्याकडे आहेत, पण समोरचा व्यक्ती जबरदस्तीने अतिक्रमण करतोय. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे,” अशी भूमिका अधिकृत परवानगीधारक आयोजक गणेशराव काळे यानी सांगितले.
दुसरीकडे साहित्य टाकणाऱ्या व्यक्तीचा दावा काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाची भूमिका काय?
या संपूर्ण प्रकारात जिल्हा परिषद,वसमत नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. परवानगी एकाला दिली आणि दुसराच जर विना परवानगी उत्सव चालवत असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
चार दशकांची परंपरा असलेल्या या दसरा उत्सवात असा हायजॅक करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी भावना वसमतकर व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Back to top button
Don`t copy text!