आपला जिल्हाराजकीयसामाजिक

परभणी मध्यवर्ती बॅक निवडणूकीत आ.राजुभैय्या नवघरे यांचा दणदणीत विजय ,परभणी जि.म.स.बॅक.संचालक मंडळ निवडणूक विजयी उमेदवार व पडलेली मते

मुख्य संपादक रामु चव्हाण

 

वसमत CT NEWS
संपादक: रामु चव्हाण

परभणी / प्रतिनिधी:
सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (PDCC)  संचालक मंडळ -2026 चा निकाल आज नुकताच घोषित करण्यात आला .

*वसमत CT NEWS चा दणदणीत डंका! आमदार राजू भैय्या यांच्या ऐतिहासिक विजयानंतर खास बातमी*
*‘अपराजित योद्धा’ आमदार राजू भैय्यांचा जिल्हा बँक निवडणुकीत झंझावाती विजय; विरोधक भुईसपाट!*
*वसमत CT NEWS*

“वसमत तालुक्याच्या मातीशी नातं सांगणाऱ्या आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाला हरवणं अशक्य आहे,” हा विश्वास आज वसमतच्या जनतेने आणि मतदारांनी पुन्हा एकदा मतपेटीतून सिद्ध केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील *‘अपराजित योद्धा’ आमदार राजू भैय्या नवघरे* यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवत एकतर्फी आणि ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

‘वसमत CT NEWS’ ने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात आता फक्त आणि फक्त आमदार राजू भैय्या यांच्याच विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
*७९ पैकी तब्बल ५८ मते मिळवत विरोधकांना चार मुंड्या चीत!*
या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत एकूण *७९ मतदारांनी* आपला हक्क बजावला होता. यापैकी तब्बल *५८ मते* आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या पारड्यात टाकून मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा भक्कम शिक्कामोर्तब केले आहे.
विरोधी उमेदवार तुषार जाधव यांना  *२० मतांवर* समाधान मानावे लागले असून १ मत बाद ठरले आहे. ३८ मतांच्या प्रचंड आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत राजू भैय्या यांनी आपला ‘एकही निवडणूक न हारण्याचा’ इतिहास पुन्हा एकदा कायम राखला आहे.

या निवडणुकीत असलेले उमेदवार व त्याना मिळालेली मते खालील प्रमाणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!