वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचा ‘रस्ता रोको आंदोलन’ – NEET पेपरफुटी, लोडशेडिंगसह 6 मागण्यांसाठी हजारो नागरिक उतरणार रस्त्यावर
वसमत: रामु चव्हाण
वसमत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोठा टी-पॉईंट येथे दि 25 जुलै रोजी संभाजी ब्रिगेड च्या वतीने मोठ्या प्रमाणात ‘रस्ता रोको आंदोलन’ करण्यात येणार आहे सकाळी 11 वाजता होणा-या या आंदोलनात हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, शेतकऱ्यांच्या समस्या आणि वसमत तालुक्यातील अघोषित लोडशेडिंग या प्रमुख मुद्द्यांवरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे
आंदोलनाची 7 मुख्य मागण्या
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शासनाकडे खालील मागण्या केल्या:
1. हळद पीक विमा तात्काळ मंजूर करावा.
2. NEET पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
3. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. दोषींवर कारवाई करावी.
4. सदाभाऊ खोत यानि विद्यार्थ्यां बाबत केलेल्या वक्तव्या बद्दल जाहीर माफि मागावी
5. ग्रामीण भागातील लोडशेडिंग तात्काळ बंद करावी.
6. शेतीसाठी रात्री सिंगल फेज वीज सुरू ठेवावी.
*पदाधिकाऱ्यांचे म्हणणे*
संभाजी ब्रिगेड वसमतच्या वतीने बोलताना , “सरकार विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. NEET सारखी परीक्षा फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दुसरीकडे वसमत तालुक्यात रात्री-बेरात्री लाईट जात असल्याने शेतकरी आणि नागरिक त्रस्त आहेत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सतीष महागावकर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड हिंगोली”
Back to top button
Don`t copy text!